वडगांव मावळ : ग्रामपंचायतीचा नाहरकत दाखला देण्यासाठी १ लाख रुपयांची लाच मागणाऱ्या साते गावच्या सरपंच व ग्रामपंचायत सदस्यास लाच लुचपत प्रतिबंध विभागाकडून रविवारी(दि.३१) अटक करण्यात आली आहेत.
साते ग्रामपंचायतीच्या हद्दीतील भंगार दुकान चालू ठेवण्यासाठी व ग्रामपंचायत नाहरकत दाखला देण्यासाठी सरपंच व सदस्य यांनी भंगार दुकान दाराकडून १ लाख २५ हजार रुपयांची मागणी केली होती. तडजोडीअंती १ लाख रुपये रक्कम देण्याचे ठरले होते .
त्यानुसार रविवारी ( दि.३१) दुपारी १२ वाजल्याच्या सुमारास ग्रामपंचायत सदस्य ऋषिनाथ आगळमे यांना कान्हे फाटा येथील हॉटेल शिवराजचे पाठीमागे तक्रारदार यांचे कडून १ लाख रुपयांची लाच रोख स्वरूपात स्वीकारताना त्यांना लाच लुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने रंगेहाथ ताब्यात घेतले आले आहे.
तसेच ग्रामपंचायत सदस्याकडून चौकशी करून यात सहभागी असलेले सरपंच संतोष पोपट शिंदे यांना देखील अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई लाच लुचपत प्रतिबंध विभागाचेपोलीस निरीक्षक भारत साळुंखे,पोलिस निरीक्षक सुनील क्षीरसागर , पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, पोलीस कर्मचारी भूषण ठाकूर,रियाज शेख,दिनेश माने,अंकुश आंबेकर,सौरभ महाशब्दे, चालक माळी, चालक दिवेकर. यांच्या पथकाने केली आहे.

error: Content is protected !!