परळी:
‘वाढत्या शहरीकरणामुळे बांधकाम क्षेत्राशी संबंधित व्यवसायास निश्चितच मोठा वाव आहे. प्रामाणिकपणा व सातत्य ठेवले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही.व्हिजन ठेवून काम केले .तर सर्व काही शक्य आहे. उत्तम व दर्जेदार सेवा यामुळे कंपनीने अल्पावधीतच नावलौकिक मिळवता येतो असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
परळी येथील नगरसेवक पवनकुमार मुंडे यांच्या एमव्हीआर या रेडिमिक्स काँक्रीट व्यवसायाच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात शुभेच्छा देताना आमदार शेळके बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षा माजी महिला बालकल्याण मंत्री पंकजा गोपीनाथराव मुंडे, पर्वती विधानसभेच्या माजी आमदार माधुरी मिसाळ, भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे,पोलीस उपायुक्त मंचकराव इप्पर, नगरसेवक पवनकुमार मुंडे, मीनाक्षी पाटील, नगरसेविका,योगिता नागरगोजे,नगरसेवक केशव घोळवे, सदाशिव खाडे, माजी नगरसेवक दत्तात्रय खाडे, अशोक मुंडे, नीळकंठ चाटे, भरत गीते, समीर फाटक, उपेन छाजेड, गजानन गावडे, चैतन्य रायसोनी, निलेश बोधळे, बाळासाहेब गिते, विनायक साठे, दिपक बांगर, विनोद सामंत व इतर मान्यवर उपस्थित होते.
- हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठाण मावळ व पोलीस फ्रेन्ड्स वेलफेअर असोसिएशनच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप
- सफर 361 किल्लांची ग्रुपकडून ढाक गडावर स्वछता मोहीम
पाण्याच्या टाकीला मारले जाळे स्वछता राखण्याचे केले आवाहन - भराव खचल्याने ढंपर उलटल्याची घटना
- साते येथील कंपनीत अडकलेल्या भेकरास वन्यजीवरक्षक संस्थेकडून जीवदान
- सावित्रीच्या लेकीची पायपीट थांबविण्यासाठी करंजगावात सायकल वाटप





