कामशेत:
सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विध्यार्थी अकादमी मावळ आयोजित भव्य किल्ले बनवा स्पर्धचे आयोजन करण्यात आले आहे. मागील पाच वर्षापासून ह्या स्पर्धा घेण्यात येत आहे. स्पर्धा फक्त कामशेत शहरापूरती मर्यादित आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान मावळ मागील काही वर्षापासून गड किल्ले संवर्धनासाठी कामं करत आहे अनेक गड किल्यावर गड स्वछता, दिशादर्शक फलक लावणे आदी कामे करत आहेत.तर सह्याद्री विदयार्थी अकादमी मावळ तालुक्यातील विध्यार्थ्यांसाठी कामं करत आहे, तसेच अकादमीच्या वतीने काही उपक्रम देखील राबवले आहेत,त्यामध्ये शाडूच्या मातीपासून गणेशमूर्ती बनवने प्रशिक्षण शिबीर , रद्दी मोहत्सव,विद्यार्थी दत्तक योजना,शैक्षणिक साहित्य वाटप,वक्तृत्व स्पर्धा,नृत्य स्पर्धा व दिवाळी निमित्त किल्ले बनवा स्पर्धा असे उपक्रम असतात.
दिवाळी जवळ येऊ लागली कि सर्वाना वेध लागतात तें म्हणजे किल्ला बनवणे.बनवलेल्या किल्ल्यावर काही प्रतिकृती ठेवणे त्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज,मावळे अश्या काही प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळतात तसेच किल्ल्याचे स्वरूप, वापरलेल्या वस्तू व सजावट ह्या आकर्षक गोष्टी ह्या मध्ये असतात.मुलांना ऐतिहासिक घटनांची माहिती व्हावी तसेच प्रत्येक किल्ल्याचा इतिहास समजावा ह्यासाठी सह्याद्री प्रतिष्ठान व सह्याद्री विध्यार्थी एकादमी मावळ यांच्या वतीने हा उपक्रम घेतला जातो.


वरील स्पर्धेचे मुख्य आयोजक
चेतन वाघमारे, अश्विन दाभाडे, विशाल सुरतवाला, संजय कटके, चिन्मय गायकवाड हे दुर्गसेवक आहेत.
तसेंच स्पर्धत सहभागी होणाऱ्या प्रमाणपत्र देण्यात येते.
विजेत्या प्रथम तीन क्रमांक प्राप्त स्पर्धेकांना विशेष बक्षिस दिली जातात.
बक्षीस स्वरूप पुढीलप्रमाणे
प्रथम क्रमांक -1500 रुपये रोख.
सन्मानचिन्ह, शौर्यगाथा मावळच्या शक्तीपिठाची हे पुस्तक.
द्वितीय क्रमांक – 1000 रुपये रोख.
सन्मानचिन्ह, शौर्यगाथा मावळच्या शक्तीपिठाची पुस्तक.
तृतीय क्रमांक – 700 रुपये रोख.
सन्मानचिन्ह, शौर्यगाथा मावळ च्या शक्तीपिठाची पुस्तक.
उत्तेजनार्थ – शौर्यगाथा मावळ च्या शक्तीपिठाची पुस्तक.
सर्वांत्कृष्ट किल्ल्यास – हिरोजी इंदुलकर पुरस्कार देण्यात येनार आहे.
सह्याद्री प्रतिष्ठान च्या वतीने आगामी काळात किल्ले तुंग (कठीणगडावर)
संवर्धन चे कामी हाती घेण्यात आले आहे. त्यामध्ये गडावर जाण्यासाठी दगडी पायऱ्या बांधणे व संपूर्ण किल्ला संवर्धन करणे यासाठी निधीसंकलन करणे चालू आहे तरी सर्व दुर्गसेवकांना प्रतिष्ठान च्या वतीने आव्हान करण्यात येत आहे कि आपणही या कामात खारीचा वाटा उचलावा.

error: Content is protected !!