पवनानगर :
शेतीला जोडधंदा केल्यास शेती फायदेशीर ठरते सैद्रिंय शेतीसोबत शेतीपूरक व्यावसायातुन प्रगती करणे शक्य असल्याचे मत कृषी सहाय्यक अर्चना वाडेकर यांनी केले.
तुंग येथे मधमाशीपालन,गावरान कुक्कुटपालन, सेंद्रिय शेती प्रकल्प यांना भेट देऊन विविध उपक्रमांची माहिती घेतली बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी मधमाशीपालन, गावरान कुक्कुटपालन, व्यावसाय सुरू केले असून यामाध्यमातुन महिला स्वता व्यावसायिक होत आहे
याठिकाणी उपलब्ध होत असलेली मध,गावरान कोबंडी पालन,अंडी,शेळीपालन, यांना मोठ्या प्रमाणावर मागणी आहे ग्रामीण भागातील महिला कुटुंबाच्या उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक अडचणींना सामोरे जात स्वावलंबी होत आहे महिलांनी अनेक अडचणींचा सामना करत व्यावसाय सुरू केले आहे .
याला भविष्यात मोठी बाजारपेठ मिळणार असुन महिलांना चांगला रोजगार उपलब्ध होईल अशी आशा व्यक्त केली.यावेळी कृषी सहाय्यक नविनचंद्र बोराडे,उपसरपंच शांताराम पाठारे,प्रगतशील शेतकरी एकनाथ ठोंबरे,संतोष पांगारे,बचत गटाच्या सी.आर.पी सिमा पाठारे,लहु धनवे,रामदास ठोंबरे,प्रशांत पाठारे,आकाश ठोंबरे,गौतम वाघमारे यांच्यासह गावातील महिला व शेतकरी उपस्थित होते.
मावळ तालुका हा भाताचे कोठार आहे .येथील शेतकऱ्याचे मुख्य पीक भात असल्याने शेतकरी ही कृषी विभागाच्या सल्याने नवनवीन तंत्रज्ञान वापरून जास्तीत जास्त उत्पादन काढताना दिसत आहे .
महाराष्ट शासन कृषी विभागाने ही शेतकऱ्यांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी दरवर्षी प्रमाणे भात पीक स्पर्धेचे राज्य ,जिल्हा ,तालुका स्तर स्पर्धाचे आयोजन केले आहे .भातपिक स्पर्धेत ही मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांनी उत्साहाने भाग घेतल्याचे दिसून येते.
७५ शेतकऱ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला असून सध्या स्पर्धक शेतकऱ्यांची भात कापणी शासनाने नेमून दिलेत्या कमिटी मार्फत कापणी चालू आहे .कमिटी मध्ये एक कृषी अधिकारी , कृषि पर्यवेक्षक , दोन स्पर्धक शेतकरी , एक प्रगतशील शेतकरी , ग्रामसेवक , तलाठी ,कृषिसहायक हे आहेत
बचत गटाच्या प्रमुख सिमा पाठारे म्हणाल्या,” गावातील महिलांना गावात रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून तळेगांव येथिल रुडसेट संस्थेच्या वतीने मधमाशीपालन व्यावसायाचे ३० महिलांनी प्रशिक्षण घेतले. गावातील महिला गावातच एका खाजगी कंपनीत कामाला जात होत्या. परंतु २ वर्षापूर्वी ही कंपनी बंद झाल्याने रोजगाराचे साधन उपलब्ध नसल्याने उदरनिर्वाहासाठी पर्याय शोधण्यासाठी गावात १३ बचत गटाच्या माध्यमातून १५० महिला एकत्रित येत व्यावसायिक दृष्टिकोनातुत नोकरीच्या मागे न लागता स्वता चा रोजगार निर्मिती करत आहे.
यामध्ये सैद्रिंय पध्दतीने शेतीत विविध पिके घेत आहे, शेळीपालन,गावरान कुक्कुटपालन, मध गोळा करणे अदी उद्योग सुरू आहे याला अधिक व्यापक करण्याचा मानस व्यक्त केला आहे
वैशाली म्हसकर म्हणाल्या,” पूर्वी खाजगी कंपनीत कामाला जात होते .परंतु कंपनी बंद झाल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. आता मधमाशीपालन प्रशिक्षण घेतल्यानंतर घरातल काम पाहून मधमाशीपालन व कुक्कुटपालन दोन्ही व्यावसाय छोट्या प्रमाणात सुरू केला आहे . अंडी व मध यांना चांगली मागणी आहे यातून कुटुबांचा उदरनिर्वाह होत आहे.

error: Content is protected !!