वडगाव मावळ:
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशाने PAN INDIA कायदेशीर जागरूकता मोहिमेअंतर्गत जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुणे मार्फत भेगडे लॉन्स ,वडगाव मावळ येथे दिनांक 31.10.2021 वार रविवार रोजी विधी सेवा महाशिबीर व शासकीय सेवा – योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आलेला आहे.
या शिबिराअंतर्गत प्राधान्याने पुढील आरोग्यसेवा नागरिकांना उपलब्ध असणार आहेत. तरी सर्व उपलब्ध आरोग्यसेवांचा मावळ तालुक्यातील सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉ.चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय वडगाव मावळ डॉ.जयश्री ढवळे वैद्यकीय अधीक्षक उपजिल्हा रुग्णालय लोणावळा डॉ. इंद्रनील पाटील यांनी केले आहे
शिबिरात उपलब्ध असणाऱ्या आरोग्यसेवा
•कोवीड -19 लसीकरण
COVISHIELD, COVAXIN पहीला व दुसरा डोस
•कोवीड-19 तपासणी
(RAT,RTPCR)
• रक्तदान शिबिर
• दंतरोग तपासणी
•नेत्ररोग तपासणी
•जनरल हेल्थ चेक अप
•रक्त तपासणी
(हीमोग्लोबिन, ब्लड ग्रुप ,शुगर)
• असांसर्गिक आजार ,जलजन्य आजार, किटकजन्य आजार माहिती
•बालरोग तपासणी व जनजागरण (सेव द चाइल्ड संस्थेद्वारे)
•आरोग्य विषयक विविध शासकीय योजनांची माहिती
•वैद्यकीय उपचार खर्च मदत योजना (पंतप्रधान जन आरोग्य योजना, महात्मा फुले जन आरोग्य योजना)

error: Content is protected !!