टाकवे बुद्रुक:
मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना फी सवलत देणेबाबत आमदार सुनिल शेळके यांनी दिलेला पाच टक्के योगदानाचा शब्द पाळला.आंदर मावळातील टाकवे बुद्रुक येथील राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल व माजी सरपंच चिंधू मारुती असवले हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना पाच टक्के योगदानातून दिड लाख रुपयाचा धनादेश मावळचे आमदार सुनिल शेळके यांचे बंधू उद्योजक सुधाकर शेळके यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या विश्वस्त मंडळाकडे सुपूर्द करण्यात आला.
राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी असवले ,उपाध्यक्ष मनोज जैन,सचिव रामदास वाडेकर,खजिनदार तानाजी असवले ,संस्थेचे संचालक समाज कल्याण चे माजी सभापती अतिष परदेशी, संस्थेचे संचालक व सरपंच भूषण असवले,संचालक दत्तात्रय गायकवाड,संचालक सोमनाथ असवले,संचालक स्वामी जगताप, संचालक पांडुरंग मोढवे, संचालक राज खांडभोर, शाळेचे मुख्याध्यापक किरण केंद्रे उपस्थित होते.
कोरोना पार्श्वभूमीवर मावळ तालुक्यातील विनाअनुदानित शाळेमधील सर्व विद्यार्थ्यांना पस्तीस टक्के फी सवलत देण्यात यावी या आशयाची बैठक आमदार सुनिल शेळके यांच्या अध्यक्षतेखाली वडगाव मावळ येथे झाली होती. या बैठकीत विनाअनुदानित शाळेतील विद्यार्थ्यांच्या फीमधील पाच टक्के फी देण्याचा शब्द आमदार सुनिल शेळके यांनी पालक व शिक्षण संस्थांना दिला होता .
हा शब्द सुनिल शेळके यांच्याकडून पाळला जात असून अंदर मावळातील सर्वात पहिल्या इंग्रजी माध्यमातील असवले इंग्लिश मीडियम स्कूलला धनादेश देऊन आमदार शेळके यांनी शिक्षक व पालकांची दिवाळी गोड केली. राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाच्या या शैक्षणिक संकुलात सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलं शिक्षण घेत आहे .या विद्यार्थ्यांच्या पाठीशी आमदार शेळके मदत देऊन उभे राहिल्याने संस्थेचे अध्यक्ष शिवाजी असवले यांनी त्यांचे आभार मानले .
आमदार सुनिल शेळके यांनी यापूर्वी संस्थेला वेळोवेळी मार्गदर्शन करून आर्थिक मदतीचा मोठा हातभार लावला आहे. ज्यामुळे संस्थेची भव्य इमारत उभी राहिली असून यामुळे खेड्यापाड्यातील मुलांना उत्तम प्रकारचे दर्जेदार शिक्षण घेता येत आहे.

error: Content is protected !!