पवनानगर :
पुणे जिल्हा भाजपा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष बाळासाहेब घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त रामायणाचार्य ह. भ. प. महाराष्ट्र भूषण रामरावजी ढोक महाराज यांची किर्तन रुपी सेवा होणार आहे. रविवार दिनांक 31 ऑक्टोबर रोजी दुपारी साडेचार वाजता पवननगर येथील चौकात हे कीर्तन होणार आहे .
घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त ही पर्वणी नागरिकांसाठी आयोजित करण्यात आली आहे. माजी राज्यमंत्री बाळा भेगडे ,भाजपाचे प्रवक्ते आमदार राम कदम, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे ,मावळ तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे,जिल्हा परिषद सदस्य अलका धानिवले,जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे, मावळ तालुका पंचायत समितीच्या सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती ज्ञानेश्वर दळवी , माजी सभापती एकनाथ टिळे,माजी सभापती निकिता घोटकुले,माजी सभापती सुवर्णा कुंभार,उपसभापती दत्तात्रेय शेवाळे ,संत तुकाराम साखर कारखान्याचे संचालक श्यामराव राक्षे, माजी संचालक पांडुरंग ठाकर, मावळ तालुका भारतीय जनता पार्टी महिला आघाडीच्या अध्यक्षा सायली बोत्रे ,भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे, यांच्यासह पवन मावळातील भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ कार्यकर्ते पदाधिकारी, युवक कार्यकर्ते, महिला , विविध सेलचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे पदाधिकारी ,सामाजिक संस्था ,संघटना, मंडळे ,प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व वारकरी संप्रदायातील अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
घोटकुले यांच्या वाढदिवसानिमित्त शिवली येथे महा अभिषेक, रुग्णांना फळ वाटप ,विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप हेआही उपक्रम साजरे केले जाणार आहेत.
मावळ तालुका भारतीय जनता पार्टी व पाडले बुद्रुक ग्रामस्थ यांच्या वतीने वाढदिवसाचं औचित्य साधून बाळासाहेब घोटकुले यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!