पवनानगर : सांस्कृतिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीत काम करणाऱ्या राष्ट्रीय बंधुता साहित्य परिषद पुणे तथा रोटरी क्लब ऑफ डायनॅमिक भोसरी यांच्या संयुक्त विद्यमानाने शैक्षणिक क्षेत्रात करत असलेल्या कार्याबद्दल पवना विद्या मंदिर शाळेत मराठी विषयाच्या अध्यापन करणाऱ्या रोशनी ज्ञानेश्वर मराडे यांना २२ व्या राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलनात जिल्हास्तरीय ‘साने गुरुजी मूल्यजागर’ पुरस्काराने पुणे येथे महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्याहस्ते सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय साहित्य समेलंन अध्यक्ष चंद्रकांत वानखेडे,संस्थापक अध्यक्ष प्रकाश रोकडे, स्वागत अध्यक्ष अशोक पगारिया,कवी शंकर आथ्रे ,विजय कुमार मार्लेचा उपस्थित होते. रोशनी मराडे ह्या मराठी विषयाच्या तज्ञ अध्यापिका असून विद्यार्थांना ज्ञानदानाचे काम करत असताना त्यांनी अनेक विषयावर कविता लेखन देखील केले आहे,लवकर त्यांचा कविता संग्रह देखील प्रसिद्ध होणार आहे. त्यांना जिल्हास्तरीय मिळालेल्या पुरस्काराबद्दल नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे व संस्थेचे सचिव व पवना शालेय समिती अध्यक्ष संतोष खांडगे,पवना संकुलाच्या प्राचार्या अंजली दौंडे,पर्यवेक्षिका निला केसकर,शिक्षक प्रतिनिधी राजकुमार वरघडे यांंच्यासह शैक्षणिक क्षेत्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे पुरस्काराबद्दल अभिनंदन केले.

error: Content is protected !!