पवनानगर : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व भौतिक सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सरपंच परिषद प्रयत्न करणार असल्याचे मत मावळ तालुका सरपंच परिषदेचे अध्यक्ष सुनिल भोंगाडे यांनी व्यक्त केले.
पवना शिक्षण संकुल पवनानगर येथे पवना विद्या मंदिर व मावळ तालुका सरपंच परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने पवनमावळ पंचक्रोशीत सरपंच, पवना शिक्षण समिती सहविचार सभा आयोजित करण्यात आली होती यावेळी भोंगाडे प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
पुढे बोलताना भोंगाडे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थी हे खऱ्या अर्थाने सर्वगुणसंपन्न असतात परंतु ग्रामीण भागात आवश्यक तेवढ्या भौतिक सुविधा उपलब्ध नसतात तर काहिंना आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहावे लागते त्याचप्रमाणे प्रत्येक ग्रामपंचायतीला शिक्षणावर खर्च करण्यासाठी ठराविक निधी उपलब्ध असतो त्याचा वापर विद्यार्थ्यांसाठी व्हावा यासाठी मावळ तालुका सरपंच परिषद पुढाकार घेणार आहे
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मावळ तालुका सरपंच परिषदेचे तालुका अध्यक्ष सुनिल (नाना) भोंगाडे, पवना शालेय समितीचे सदस्य नारायण कालेकर, प्रल्हाद कालेकर, करुंजचे सरपंच सदाशिव शेंडगे,कालेचे सरपंच खंडुजी कालेकर, महागाव सरपंच सोपान सावंत, वारुचे सरपंच शाहिदास निंबळे, सुनिल निंबळे, ठाकुरसाई गावचे सरपंच नारायण बोडके,कडधेचे सरपंच संजय केदारी,तिकोणा सरपंच ज्ञानदेव मोहोळ,किरण बोडके, येळसेचे सरपंच सिमाताई ठाकर, उपसरपंच अक्षय कालेकर, महागावचे उपसरपंच पांडुरंग पडवळ,वारुचे उपसरपंच उज्वला शिंदे,कडधेचे उपसरपंच बजरंग तुपे,संभाजी तुपे,पर्यवेक्षिका निला केसकर यांच्यासह परिसरातील ग्रामपंचायतीचे सरपंच व उपसरपंच उपस्थित होते.
यावेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली यामध्ये परिसरातील विद्यार्थ्यांना येणाऱ्या शैक्षणिक समस्या, विद्यार्थ्यांची वाहतूक व्यवस्था ,आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर पडलेले विद्यार्थ्यांना प्रवाहात आणण्यासाठी उपायोजना, शाळेतील भौतिक सुविधा व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास याबाबत चर्चा करण्यात आली.
यावेळी सरपंच सदाशिव शेंडगे,नारायण बोडके,खंडु कालेकर,सोपान सावंत यांनी आपली मनोगते व्यक्त केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या अंजली दौंडे यांनी केले सुत्रसंचालन भारत काळे यांनी केले तर आभार सुनिल बोरूडे यांनी मानले.

error: Content is protected !!