वडगाव मावळ:
रिक्षा चालवणारे वडील व मंदिराच्या बाहेर फुले हार  विकणारी आई  यांची मुलगी भारत तिब्बत चीन सीमेवर तैनात झाली आहे.
सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये असलेल्या कशाळ गावची कन्या कु. फाल्गुनी सतीश जाधव. हिचे मूळ गाव आंदर मावळ मधील खेडे भागातील कशाळ गाव तीचा जन्म हा 1998 मंध्ये मामाच्या गावाला टाकवे बुद्रुक येथे झाला. तिच्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असल्यामुळे वडिलांनी निर्णय घेऊन मुंबईला जाण्याचे ठरवले. मुंबईला गेल्यानंतर रिक्षा चालवून घर सांभाळत. फाल्गुनीच्या आईला पहिल्यापासून कामाची आवड असल्यामुळे आपल्या पतीला काहीतरी हातभार लावावा या हेतूने मंदिराच्या बाहेर बसून फुले हार विकून संसाराचा गाडा हाकत आहे. घरी पत्नी दोन मुले व त्यांचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी वडील मुंबई येथे रात्रंदिवस रिक्षा चालवत, तर आई वृषाली पहाटे चार वाजता फुले आणून मंदिराच्या बाहेर हार तयार करून विकत आहे, अत्यंत बिकट व हालाकीच्या परिस्थिती मध्ये सुविद्यालय ( मुंबई बोरीवली ) दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण करून गोखले महाविद्यालयातून समाजशास्त्र ह्या विषयात पदवी पूर्ण करून भारत सरकारद्वारे घेण्यात आलेल्या स्टाफ सिलेक्शन कमिशन स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश संपादन करून (ITBP ) मध्ये भारत – तिब्बत सीमा पोलीस मंध्ये निवड झाली. घरची परिस्थिती बिकट असल्यामुळे शिक्षण घेण्यासाठी अडचणी येत असताना आईचे वडील टाकवे बुद्रूक येथील संप्रदाय क्षेत्रातील दत्तोबा असवले (आजोबा ) यांनी मला शिक्षणासाठी वेळोवेळी आर्थिक मदत केली. लहानपणापासून आई – वडिलांनी, आजी-आजोबांनी देश सेवा विषयी आवड निर्माण करून दिली.
आईवडिलांची आजी-आजोबांचे सर्व स्वप्न उराशी बाळगून 2017 साली स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली.2018 मंध्ये ssc मार्फत निघालेल्या स्पर्धा परीक्षेत भाग घेतला व 21/ जानेवारी /2021 रोजी. भारत सरकारच्या स्टाफ सिलेक्शन कमिशनमंध्ये यश संपादन केले. हे माझे जीवन जीवन देश सेवेसाठी अर्पण असल्याची भावना फाल्गुनी हिने व्यक्त केली.
माजी उपसरपंच तुकाराम जाधव म्हणाले,”फाल्गुनी सतिश जाधव हिची भारत तिब्बत सीमा पोलीस सैन्य दलात(जी,डी) या पदावर निवड झाली आहे, सौ व श्री. वृषाली सतिश पांडुरंग जाधव यांची ही कन्या .संपूर्ण शिक्षण मुंबई बोरिवली या ठिकाणी झाले. गुणवत्तेच्या जोरावर यश संपादन केल्यामुळे सर्व स्तरावरुन कौतुक होत आहे ,गावातील मुलगी चांगल्या पदावर गेल्यामुळे ग्रामस्थाना खुप आनंद झाला आहे त्यामुळे गावचा नावलौकिक झाला आहे.

error: Content is protected !!