सोमाटणे:
दिलीप राक्षे मित्र परिवाराच्या वतीने कुसगाव प. मा येथील खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रमाला माता भगिनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाला गावातील आजी माजी सरपंच, उपसरपंच, सदस्य,पोलीस पाटील,चेअरमन,व्हा.चेअरमन आणि गावातील सर्व सहकारी उपस्थित होते.सिने अभिनेत्री पूजा काळभोर यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन केले.
या कार्यक्रमात तळ्यात-मळ्यात, संगीत खुच्यीँ रिंग पासिंग,चेंडू बादलीत टाकणे या खेळांमध्ये सुमारे सत्तर महिलांनी सहभाग घेतला.अशा या महिला शक्तीचा सन्मान करणाऱ्या कार्यक्रमात मानाची पैठणी पटकावली ती निलीमा निलेश मांडे यांनी.
तर सोन्याच्या नथ वर अधिकार जमवला तो सुषमा दीपक केदारी यांनी. तिसरा क्रमांक पटकावला अर्चना निलेश केदारी यांनी. कार्यक्रमाला मिळणारा उस्फुर्त प्रतीसाद हेच आमचे आशिर्वाद असल्याच्या भावना दिलीप राक्षे यांनी व्यक्त केल्या.

error: Content is protected !!