वडगाव मावळ:
पुणे महानगर नियोजन समिती सदस्यपदाच्या
निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या चार उमेदवारांची घोषणा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व सरचिटणीस अविनाश बवरे यांनी केली. पीएमआरडीएच्या सदस्य पदासाठी येत्या १० नोव्हेंबरला
निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी जिल्हा भाजपने पक्षाचे अधिकृत चार उमेदवार जाहीर केले आहेत.
त्यानुसार लहान नागरी निर्वाचन क्षेत्र.मतदार संघात अरुण जगन्नाथ भेगडे (तळेगाव दाभाडे), ग्रामीण,निर्वाचन क्षेत्र मतदार संघात स्वप्नील दत्तात्रेय उंद्रे (हवेली), मिनिनाथ मारुती कानगुडे (मुळशी) कुलदीप गोविंद बोडके (मावळ) यांना उमेदवारी देण्यात
आली आहे.

error: Content is protected !!