मुंबई:
राष्ट्रवादी सेवा दलाचे प्रदेशाध्यक्ष स्व. दीपक मानकर यांच्या श्रद्धांजली सभेचे आयोजन आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दीपक मानकर यांना श्रद्धांजली वाहून त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी कोषाध्यक्ष हेमंत टकले, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर पाटील, सेवा दलाचे प्रदेश कार्याध्यक्ष जानबा म्हस्के, सेवा दलाच्या उपाध्यक्षा सुनिता काटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
स्व. दीपक मानकर यांनी सेवा दलाचे काम करत असताना सेवाभावी वृत्तीने आणि निस्वार्थी भावनेने कायम काम केले. त्यांची आठवण आमच्या मनात चिरंतन राहिल, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली. तर कोषाध्यक्ष हेमंत टकले म्हणाले की, दीपक मानकर यांच्याप्रमाणेच सेवा दलाच्या प्रत्येक कार्यकर्त्याने पुढे काम करावे. प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनी दीपक मानकर यांना अडचणीच्या काळात मदत करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
या श्रद्धांजली सभेला राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश चिटणीस संजय बोरगे व सेवा दलाचे प्रमुख पदाधिकारी देखील उपस्थित होते.

error: Content is protected !!