कामशेत :
कामशेत जवळील पाथरगावला पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्गावरून गावाला जोडणाऱ्या रस्त्याचे काम आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने मार्गी लागले.
जुना मुंबई पुणे महामार्ग ते दत्त मंदिरा पर्यंतच्या रस्त्याच्या कामाचे बुधवारी माजी राज्यमंत्री मदन बाफना यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले.
या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. राष्ट्रवादी कार्याध्यक्ष दिपक हुलावळे, सरपंच निलम सुतार, उपसरपंच सचिन चिन्कु केदारी, ग्रामपंचायत सदस्य पिंकी बालगुडे, रेश्मा गायकवाड, गणेश केदारी, संगिता केदारी, भानुदास येवले, बाळु भानुसघरे, लक्ष्मण बालगुडे, अमोल केदारी, संदिप बालगुडे, विजयनाथ बालगुडे, संदीप चौरे, संतोष बालगुडे, सहदेव केदारी, बाळु सोनवणे, कुंदा बालगुडे, रोहिदास बालगुडे, सुशांत बालगुडे, किरण हुलावळे, विकास केदारी, सिध्दार्थ चौरेसंतोष बालगुडे , सहदेव केदारी,बाळु सोनवणे,कुंदा बालगुडे मा उपसरपंच,रोहिदास बालगुडे,सुशांत बालगुडे आदि मान्यवर उपस्थित होते.
जुन्या मुंबई पुणे महामार्गापासून पाथरगावात जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झाल्याने येथील नागरिकांनी या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी आमदार सुनिल शेळके यांच्या कडे केली होती. नागरिकांच्या मागणीची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी पाथगावातील या रस्त्याच्या कामासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असून, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातुन या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणाचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

error: Content is protected !!