टाकवे बुद्रुक:
शेती व दुग्ध या पारंपारिक व्यवसायाला किराणा मार्टची जोड देऊन उभारलेल्या लंके मार्ट तरूण पिढी साठी आयडाॅल ठरवा अशा शुभेच्छा पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी दिल्या.मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी राजेश लंके यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या
टाकवे बुद्रुक येथील लंके मार्ट शुभेच्छा देताना आमदार लंके ते बोलत होते. लंके मार्टचे संस्थापक राजेश लंके यांनी सुरू केलेल्या लंके मार्टचे उद्घाटन आमदार लंके यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.राजेश लंके व
तसेच त्यांच्या कुटुंबियांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत सुरू केलेल्या व्यवसायाला शुभेच्छा देण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या संस्थेने उपस्थित होते.
राजू लंके यांच्या वडिलांनी प्रामुख्याने केलेल्या मेहनतीचा उल्लेख करीत, शेती व गवत व्यवसाय करून त्यानंतर आपल्या राजू सारख्या कर्तबगार मुलाला व्यवसायामध्ये उतरवले याचा दाखला देत, घोणशेत येथे लहानसे दुकान सुरु करून येणाऱ्या पुढील काळामध्ये टाकवे येथे राजश्री प्रोहिजन स्टोअर तसेच याठिकाणी लंके मार्ट ची सुरुवात केली ही बाब कौतुकास्पद असल्याचे आमदार लंके म्हणाले.
आमदार निलेश लंके म्हणाले,” व्यवसाय कोणताही करा त्यामध्ये चिकाटी, जिद्धी आणि कष्टाचे प्रमाणिकता असली पाहिजे. आपल्याकडे येणारा ग्राहक अतिथी देवो भव असतो. व्यवसाय करताना तोंडात साखर आणि डोक्यावरती बर्फ ठेवून व्यवसाय केला तर प्रगती थांबू शकत नाही, यशाच्या शिखरावरती गेल्या शिवाय राहू शकत नाही.
लंके मार्ट हे मावळभागामध्ये नव्हे तर पुणे जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये नावाजले गेले पाहिजेल लंके मार्ट यशाच्या शिखरावर चढताना दिसले पाहिजेल. शहरी भागामध्ये अनेक प्रकारे मार्ट व त्यामध्ये खूप काही सुविधा असतात त्याचप्रमाणे आंदर मावळ मधील लंके मार्ट सुरु होताना खूप आनंद होत आहे या लंके मार्ट मुळे ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू रूपी सेवा मिळतील असे बोलताना शुभेच्छा आमदार निलेश लंके यांनी दिल्या.
यावेळी बाळराजे असवले इंग्लिश मीडियम स्कूल संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव असवले, सरपंच भूषण, असवले उपसरपंच ऋषीनाथ शिंदे, खादी ग्रामोद्योगचे अध्यक्ष अंकुश आंबेकर,मावळ तालुका शिवसेना अध्यक्ष राजेश खांडभोर,माजी सरपंच दत्तात्रय पडवळ,सुनिल आंबेकर,उद्योजक अनिल मालपोटे, पोलीस पाटील अतुल असवले, माजी उपसरपंच बाबाजी गायकवाड,स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष मावळ तालुका अध्यक्ष बबन ओव्हाळ , कैलास गायकवाड, भाऊ ढोरे, अंदर मावळ कृषी पर्यटन अध्यक्ष शेखर मालपोटे, माजी उपसरपंच अविनाश,आसवले सोमनाथ असवले, गोरख मालपोटे,अनिल असवले, गजानन खरमारे,सुरेश चोरगघे, बाळू चोरघे लक्ष्मण चोरघे,गणेश घोगरे, सोमनाथ राक्षे आदी मान्यवर उपस्थित होते.लक्ष्मण शेलार यांनी सुत्रसंचालन केले.

error: Content is protected !!