मावळमित्र न्यूज विशेष:
प्रतिकूल परिस्थितीवर कष्टाने विजय मात करता येते . हे ज्याने सिद्ध केले .त्या युवक कार्यकर्त्याची सकारात्मक पाऊले प्रगतीच्या दिशेने पडू लागली आहे. या त्याच्या यशाचे गमक,त्याचा सुस्वभाव,कष्ट करण्याची तयारी,प्रामाणिकपणा, सलोखा आणि कल्पकता याला आहे.
राजकारणाच्या पलिकडे जाऊन काम करता येते हे ज्याला सिद्ध करायचे तो युवक कार्यकर्ता किरण मच्छिंद्र वाडेकर,वहानगावचा.योद्धा फाऊंडेशन या सामाजिक संस्थेचा अध्यक्ष. जो उत्तम प्रपंच सावरू शकतो. तोच सार्वजनिक जीवनात यशस्वी होऊन,यशाच्या शिखरावर पोहचतो. हे यशाचे मोठे गमक उमगलेल्या तरूणाने महाविद्यालय शिक्षण संपताच वडीलांच्या खांद्याला खांदा लावून कष्टाला सुरूवात केली.
महाविद्यालयीन दिवसातच त्याने व्यायामाची कास धरली. बलदंड शरीरसंपदा हाच खरा दागिना हे ओळखून त्याने आपल्या सख्या सोबत्यांना व्यायामाची गोडी निर्माण केली,यासाठी त्याने कोणतीच तडजोड केली नाही. लहानश्या गावातील जिम मध्ये अनुभवातून तो व्यायामाच्या कसरती करतोय.व्यायामाच्या कष्टाने सुरू झालेला दिवस,कष्टाने संपतो.
ग्रामीण भागातील अर्थकारण शेती सोबत दुग्धव्यवसायाने जोडले आहे,हाच धागा पकडून या तरुणाने या व्यवसायात करिअर करायला सुरुवात केली. यात तो स्थिरस्थावर झालेला पाहून कुटुंबिय समाधानी आहे. बापाच्या नावाने लेकाला ओळख होते. किंबहुना हीच ओळख आयुष्याची असते. पण जेव्हा लेकाच्या नावाने बापाची ओळख वाढू लागते त्या सारखे समाधान,आनंद आणि ऐश्वर्य कोणतेच नाही.
सध्या कळीत फुलणा-या या तरूणाने आपली कर्तबगारी सिद्ध करून यशस्वी व्हावे या परीस वेगळ्या शुभेच्छा त्याला आजच्या वाढदिवसानिमित्त द्याव्या त्या कोणत्या
सा-या कुटूंबाचा आधार,अपेक्षा आणि नाक असलेला हा तरूण आपले कर्तृत्व सिद्ध करील यात कोणतीही शंका नसल्याने,त्याचे कर्तृत्व चहूबाजूने बहरावे याच शुभेच्छा.

error: Content is protected !!