पवनानगर :
पवन मावळातील करुंज गावच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळा ते शेंडगे वस्तीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कामाचे आमदार सुनिल शेळके यांच्या हस्ते भुमिपूजन झाले. या रस्त्याच्या सिमेंट कॉंक्रीटीकरणाच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकारातून २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.
सरपंच सदशिव शेंडगे,उपसरपंच अतुल शेंडगे, ग्रामपंचायत सदस्य अश्विनी शिंदे,काळुराम राऊत,शैलेश दहिभाते, भगवान लगड,अंकुश शेंडगे, विष्णू लोखंडे,मदन वाळूंज,संतोष लगड,अनिल जाधव, महादू लगड, संतोष शिंदे, नारायण मालपोटे, ग्रामसेवक निकम, आदि मान्यवर उपस्थित होते.
करुंज गावच्या हद्दीतील जिल्हा परिषद शाळा ते शेंडगे वस्तीकडे जाणारा रस्ता खराब झाल्याने शेंडगे वस्ती व वेताळवाडी भागात राहणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत होती.यामुळे हा रस्ता सिमेंटकॉंक्रीट चा बनविण्याची मागणी आमदार सुनिल शेळके यांच्याकडे स्थानिक नागरिकांनी केली होती. नागरिकांनी केलेल्या मागणी नुसार आमदार सुनिल शेळके यांनी गौण खनिज प्रतिष्ठाण च्या माध्यमातुन या रस्त्याच्या कॉंक्रीटीकरणासाठी २० लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. या रस्त्याच्या कामासाठी आमदार सुनिल शेळके यांनी निधी उपलब्ध करून दिल्याने नागरिकांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले आहेत.

error: Content is protected !!