वडगांव मावळ :
दहावीच्या वर्गात शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना अभ्यासात मदत व्हावी, या उद्देशाने आमदार सुनिल शेळके यांनी मावळातील दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना आयडियल स्टडी ॲप मोफत उपलब्ध करून दिले आहे. या ॲपचा दहावीच्या वर्गात शिकत असणाऱ्या तालुक्यातील सुमारे ६ हजार विद्यार्थ्यांना लाभ होणार आहे. दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी सलग चौथ्या वर्षी हे स्टडी ॲप आमदार शेळके यांच्याकडून मोफत उपलब्ध करून देण्यात येत आहे.
शालेय विद्यार्थ्यांसाठी दहावीचे वर्ष हे आयुष्याला वळण देणारे वर्ष असल्याने पालक व शिक्षक यांची देखील मुलांकडून उत्तम गुणांची अपेक्षा असते.दहावीच्या विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम सहज, सोप्या भाषेत समजून घेता यावा व अभ्यासात तज्ञ शिक्षकांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मिळावे. यासाठी आमदार सुनिल शेळके यांनी गुणवत्तापूर्ण व दर्जेदार असणारे आयडियल स्टडी ॲप तालुक्यातील सर्व विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून दिले आहे. या ॲपच्या अभ्यासक्रमाचे स्वरूप आपल्या शिक्षण पद्धतीला अनुसरून असल्याने शिक्षक देखील हे ॲप वापरण्याचा विद्यार्थ्यांना सल्ला देत आहेत.
दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरणाऱ्या हे ॲप आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये उपलब्ध करून देण्यात येत असून या आठवड्यात तुळजाभवानी विद्यालय सोमाटणे, समाज भुषण मोतीलाल शर्मा विद्यालय आढले खु., न्यू इंग्लिश स्कुल चांदखेड, पंचक्रोशी हायस्कूल दरुंब्रे, ग्रामप्रबोधनी माध्यमिक विद्यालय साळुंब्रे, श्री.भैरवनाथ माध्यमिक विद्यालय ओझर्डे, श्री भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बौर, राजहंस विद्यालय परंदवाडी, कर्मवीर विद्यालय आढले बु., श्री.संत ज्ञानेश्वर माध्यमिक विद्यालय दिवड, श्री.संत तुकाराम महाविद्यालय शिवणे, श्री पद्मावती विद्या मंदिर उर्से,आमदार प्रकाश देवळे माध्यमिक विद्यालय शिरगाव आदी. शाळांमधील विद्यार्थ्यांना आयडियल ॲप उपलब्ध करून देण्यात आले आहे.
मुख्याध्यापक गणपत कायगुडे(श्री.संत तुकाराम महाविद्यालय शिवणे ): आमदारांनी उपलब्ध करून दिलेले आयडियल स्टडी ॲप विद्यार्थ्यांसाठी खूप फायदेशीर आहे. या ॲपमुळे विद्यार्थी कधीही अभ्यास करु शकतात.ॲपच्या माध्यमातुन विद्यार्थ्यांना नोट्स व प्रश्न उत्तरे उपलब्ध होत असल्याने विद्यार्थ्यांचा उत्तम सराव होण्यास मदत होत आहे.

error: Content is protected !!