वडगाव मावळ:
पिंपरी-चिंचवड शहरातील ब्लॉसम पब्लिक स्कूल या शाळेतील २०२० या शैक्षणिक वर्षातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी निरोप समारंभाच्या पैशांतून अतिदुर्गम बेंदेवाडी शाळेस विविध प्रकारचे क्रीडा साहित्य मोफत प्रदान केले.
कोवीड काळात विद्यार्थी खेळापासून दुरावले असल्याने त्यांची शारीरिक वाढ खुंटलेली आहे.त्यांचा शारीरिक तसेच समुहविकास व्हावा या उदात्त हेतूने सदरचे क्रीडा साहित्य शाळेस दिल्याचे मत ब्लॉसम स्कूलच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी व्यक्त केले.तसेच प्राथमिक शिक्षिका स्व.वंदना प्रकाश मटकर यांच्या स्मरणार्थ प्रकाश मटकर,सारिका मटकर,वैशाली मटकर या मटकर परिवाराच्या वतीने शाळेस दोन सिलींग फँन भेटवस्तू म्हणून देण्यात आले.
कोणत्याही शाळेस मदत करण्यासारखे पुण्य नाही. त्यामुळे समाजातील विविध दानशूर व्यक्तींनी पुढे येऊन विविध जिल्हा परिषद शाळांना मदत करावी असे आवाहन मटकर यांनी केले.
यावेळी शाळा परिसरात झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात प्रकाश मटकर,शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली निमकर,शिक्षक रामेश्वर बागडे तसेच बेंदेवाडी शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते.यावेळी सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले.
बेंदेवाडी शाळेस मिळालेल्या या मदतीबद्दल खांडी केंद्राचे केंद्रप्रमूख गंगाराम केदार व शिक्षण विस्तार अधिकारी कृष्णा भांगरे यांनी समाधान व्यक्त केले.विविध शालोपयोगी साहित्य प्राप्त झाल्याने बालचमूंनी आनंद व्यक्त केला.

error: Content is protected !!