वडगाव मावळ:
साते येथील यशवंत ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी सचिन आवटे तर सचिवपदी भारत काळे यांची निवड करण्यात आली. उपाध्यक्षपदी ऋषीनाथ शिंदे, खजिनदार भरत आगळमे यांची निवडी जाहिर करण्यात आली
यावेळी संस्थेचे संस्थापक भाऊसाहेब आगळमे, संचालक विजय उभे,मारूती आगळमे,नामदेव गाभणे,माजी सचिव सुनिल शिंदे, संदिप कुंभार,मारूती आगळमे,बाळु आगळमे, व्यवस्थापिका सुलभा गावडे,संतोष शिंदे यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते
यशवंत पतसंस्था ही ग्रामीण भागातील पहिली संगणीकृत असणारी पतसंस्था असून स्वतःचे तीन मजली कार्यालय आहे.संस्थेत २२८४ एवढे सभासद असुन संस्थेचे १० कोटी ७५ लाख भागभांडवल आहे त्याचप्रमाणे संस्थेत २ कोटी ४१ लाख असुन ८ कोटी ५२ लाख रूपये संस्थेत ठेवी स्वरुपात आहेत.
आत्तापर्यंत संस्थेने ६ कोटी ३ लाख रूपये कर्ज वाटप केलेले आहे.संस्थेला कायम ऑडिट वर्ग मिळालेला आहे
निवडीनंतर अध्यक्ष सचिन आवटे म्हणाले,” पतसंस्थेचा प्रगतीचा वाढता आलेख कायम ठेवण्यासाठी सर्व संचालक मंडळाला बरोबर घेऊन प्रयत्न केले जातील.
सचिव भारत काळे म्हणाले,” सर्व सभासदांचे हित लक्षात घेऊन विविध उपक्रम राबवून पतसंस्थेच्या वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

error: Content is protected !!