वडगाव मावळ:
मुंबई पुणे द्रुतगती महामार्गाच्या सोमाटणे टोलनाक्यावरून उर्से खिंडीतून येणा-या रस्त्यावर पथदिवे नसल्याने येथून येजा करणा-या वाहन चालकांना अंधारात येजा करावी लागत असल्याची खंत नियमित प्रवास करणा-या एका वाहन चालकांनी सोशल मीडियावर केली आहे.
हे वाहन चालक म्हणताय की,”यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग होऊन वीस वर्षाहून अधिक काळ झाला आहे. उर्से टोल नाका ते तळेगांव दाभाडे या दोन किलोमीटर जोडरस्त्यावर आत्तापर्यंत एकही पथदिवा लागला नाही. दुसऱ्या वाहनांच्या प्रकाशात प्रवाशांना चालत जावे लागते.या कालावधीत अंधारात अनेक अपघात,लुटमार व खून या रस्त्यावर झाले आहेत. पावसाळ्यात तर या परिसरातील कंपनीत काम करणारे कामगार रात्री घरी जात नाहीत.
तरीही संबंधित रस्ते प्रशासन व पोलीस प्रशासन जागे झाले नाही. पथदिवे (स्ट्रीट लाईट) लागण्यासाठी एखादं आंदोलन छेडावं की हा रस्ता वाहतुकीला एक दिवस बंद करावा …नागरिकांनी यावर आपले मतप्रदर्शन करावे ही नम्र विनंती यांनी केली आहे.

error: Content is protected !!