वडगाव मावळ :
मावळ तालुक्यातील ५५ विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या बोगस सभासदांच्या विरोधातील शिव सहकार सेनेच्या पाठपुराव्याला यश आले आहे . प्रशासनाच्या या मोहिमेत विविध विकास सोसायट्यांमधील १३ हजार १७० बोगस सभासदांची नावे वगळण्यात आली आहेत . विशेष म्हणजे ११० संचालकांनाही अपात्र ठरवून ‘ या ‘ अपात्र संचालकांना सहा वर्षे निवडणूक बंदी घातल्याने मावळातील सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे .
गेल्या दोन – तीन वर्षापासून मावळ तालुक्यातील सहकार क्षेत्रातील ही घडमोडी सुरू आहे . यासंदर्भात सहकारी संस्थांचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांच्याकडे शिवसहकार सेनेकडून केलेल्या पाठपुराव्याला यश आले आहे . दोन वर्षांपूर्वीच विकास सोसायट्यांमधील बोगसगिरीचा भांडाफोड झाला . यामध्ये १० गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असलेले , मयत , बोगस नावाने शेअर्स कमी असलेले सभासद अशा सुमारे १३ हजारांहून अधिक बोगस सभासदांची पडताळणी करून त्यांची नावे काढून टाकण्यात आली . या बोगस सभासदांना कात्री लावल्यामुळे जे खरे शेतकरी सभासद आहेत . कारवाईनंतर शेतकरी सभासदांना खऱ्या अर्थाने न्याय मिळाला . बोगस सभासदांमुळे विकास सहकारी सोसायट्या डबगाईला आल्याचे सहकार विभागाच्या निदर्शनास आले . आता बोगस सभासदांना पाठिशी घालण्याचे काम सोसायट्यांचे सचिव करीत आहेत , त्या सचिवांवरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहेत . यावेळी शिव सहकार सेनेचे पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख प्रदीप कुमार खोपडे , पुणे जिल्हा संघटक रमेश जाधव उपस्थित होते . हा सर्व बोगस सभासद , अपात्र संचालक यांच्यावरील कार्यवाहीसाठी मावळ तालुका संघटक अमित कुंभार यांनी पाठपुरावा केला .
●तीन वर्षांपासून बोगस सभासद
शोधमोहीम शेतकऱ्यांच्या विविध कार्यकारी सहकारी संस्था ( विकास सोसायट्या ) ५५ आहेत . या सर्व संस्थांमध्ये ज्यांच्या नावावर शेती नाही म्हणजेच साधारणपणे १० गुंठे क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना सेवा सोसायटीचे सभासद होते . वर्षानुवर्षे जमीन नावावर नसतानाही काही व्यक्ती सभासद होते . काहींनी जमिनी विकल्या तरीही सभासद होते . काही मयत झाले तरीही त्यांची नावे यादीत होती . तसेच अपूर्ण शेअर्स असलेले सभासद होते . अशा सुमारे १३ हजार व्यक्ती चुकीच्या पद्धतीने अर्थात पात्र नसलेल्या व्यक्ती सभासद असल्याचे पाहणीत आढळून आले . या अपात्र सभासदांमुळे प्रत्येक निवडणुकीला खर्च वाढला . शेतकऱ्यांच्या हिताचा विषय सोडून गावपातळीवरील हेवेदावे , गटबाजी वाढल्याची बाबही प्रशासनाच्या निदर्शनास आल्या . चुकीच्या पद्धतीने वर्षानुवर्षे सभासद म्हणून आहेत . ते कमी करण्याची धडक मोहीम २०१८ पासून हाती घेतली आहे . तसा पत्रव्यव्हारही विकास सोसायट्यांशी केला , त्यानंतर बोगस सभासद दिसून आले , असे विठ्ठल सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले .
●’ बोगसगिरी ‘ ला पाठीशी घालणाऱ्यांवर गुन्हे
पत्रव्यव्हार केल्यानंतर सोसायटीस्तरावर बोगस नावे कमी केली . त्यानंतर बोगस सभासदांची नावे सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे पाठविण्यात आली . महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १ ९ ६० कलम ११ आणि कलम २५ नुसार अपात्र ठरविले . सध्या मावळ तालुक्यात किती बोगस सभासद आहेत . ते निश्चित सांगता येणार नाही . सध्या सहा विकास सोसायट्यांची निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे . या सोसायट्यांच्या सचिवांना बोगस सभासद ही बाब निदर्शनास आणून दिली नजरचुकीने किंवा संचालक मंडळाने बोगस सभासदांना पाठिशी घातले तर संबंधितांवर गुन्हे दाखल होऊ शकतील , असे मावळ सहकारी संस्थेचे सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी यांनी सांगितले .
विठ्ठल सूर्यवंशी , सहायक निबंधक म्हणाले,”
मावळ तालुक्यात अपात्र संचालक मोहिमेत २०१८ ते २०२० पर्यंत कर्ज थकबाकी असल्यामुळे विविध सोसायट्यांचे ११० संचालक अपात्र ठरविण्यात आले आहेत . याशिवाय सहकारातील नियमांची पायमल्ली ( नियमबाह्य ) झाल्यामुळे सुमारे १३ हजार १७० सभासदांची नावे वगळण्यात आली . आहेत . या निर्णयामुळे सहकारातील कामकाजात अधिकाधिक पारदर्शकता येईल तसेच निवडणुका जाहीर झालेल्या सहा सोसायट्यांमधील नव्याने १७० सभासदांना अपात्र ठरविले.

error: Content is protected !!