कामशेत:
मावळ तालुका शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कामशेत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महागाई विरोधात एल्गार पुकारला.महिलांनी संताप व्यक्त करीत मोदी सरकारवर निशाणा साधला.एकीकडे स्वयंपाकाला सरपण,गोव-या न वापरता गॅस वापरावा असे आवाहन केंद्र करीत असून दिवसेंदिवस महागाई वाढवून सर्व सामान्य कुटूंबाचे कंबरडे मोडीत असल्याचा संताप महिलांनी केला.
उषा इंगवले या महिलेने येथील अंदोलनात चुलीवर भाकरी भाजून सरकारचा निषेध केला णञञशिवसेना तालुकाप्रमुख राजेश खांडभोर, जिल्हा परिषद सदस्य शैला खंडागळे,लतिका पाष्टे,अनिता गोणते, कल्पना आखाडे,सिंधू परदेशी,रुपाली आहेर, मीना मुथा,अंजना मुथा,वैशाली इंगवले,अश्विनी भोकरे,वनिता वाघवले ,गऊबाई लिम्हण उपस्थित होते.अंजना मुथा म्हणाल्या,” दिवसेंदिवस केंद्र सरकार इंधन दरवाढ करीत आहे,याची झळ सर्वसामान्य माणसा सह व्यापारी यांनाही सहन करीत आहेत. वाढती महागाई रोखण्यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला पाहिजे. कल्पना आखाडे यांनी प्रास्ताविक केले. अनिता गोणते सुत्रसंचालन केले.संगीता कंधारे यांनी आभार मानले.

error: Content is protected !!