कामशेत:
कामशेतचा पूलाची नोंद इतिहासात होईल इतका हा पूल चर्चेत आला आहे. पूलाचे रेंगाळत असलेले काम तातडीने पूर्ण करावे अशी मागणी कामशेतकरांनी केली आहे.
पुलाच्या काम पूर्ण होण्याची मुदत कधीच संपली, तरीही अजून आमचा पूल काही झाला नसल्याची खंत शहरातील नागरिक करीत आहे. पूलावर संरक्षक कठडे नाही,रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे आहे. अजून काम अपूर्ण आहे. सेवा रस्त्यावर खड्डे पडले. गटारातून सांडपाणी निर्मूलन होत नाही. अशा एक ना अनेक तक्रारीचा पाढा शहरवासीय करीत आहे.
डाॅ. विकेश मुथा म्हणाले,” पुलाच्या रेंगाळत असलेल्या कामामुळे झालेल्या अपघातात आता पर्यत कित्येक जणांचे जीव गेले आहे. आजही गावकरी जीव मुठीत धरून पायपीट करीत येजा करीत आहे. पुलाच्या कामाची मुदत कधीच संपून गेली पण अजून काम काही पूर्ण झाले नाही.
शिवसेना शहरप्रमुख गणेश भोकरे म्हणले,” आज पूल होईल उद्या पूर्ण होईल या आशेचा आमचा अंत झाला. पूलाचे काम तातडीने पूर्ण करावे अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून शिवसेना स्टाईलने अंदोलन करील.शहरातील नागरिक जीव मुठीत धरून प्रवास करीत आहे. सेवा रस्तावर पडलेले खड्डे,बंदिस्त गटार,पूलाचे संरक्षक कठडे ही कामे अजून प्रलंबित आहेत.
संपर्कप्रमुख पुणे जिल्हा रिपब्लिकन पक्ष (आठवले गट) समीर जाधव,” या पुलाला दोन्ही सरकारने पहिले,याला ऐतिहासिक पूल घोषित करावा. या पुलामुळे मोठी हानी होण्याची शक्यता. सेवा रस्त्याची वाट लागली.रोज अपघातात होतात. सरकारने याचे योग्य नियोजन करावे.
शहरप्रमुख सतीश इंगवले,” निकृष्ट दर्जाचे काम स्थानिक नागरीकांना पायपीट,जीवमुठीत धरून प्रवास करावा लागतो. रस्त्याचे काम नीटनेटके व्हावे. अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

error: Content is protected !!