टाकळी बुद्रुक:
आंदर मावळातील वडेश्वर खांडी रस्त्यावर नागाथली जवळ बिबट्या आढळल्याने गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.नागरिकांनी सतर्क राहावे असे आव्हान वन विभागाच्या वतीने करण्यात आले. अंदर मावळातील खांडी, कुसुर ,बेंदवाडी,डाहूली,लोहटवाडी या परिसरात दोन वर्षापासून बिबट्या भटकतोय.
मागील महिन्या पासून बिबट्याचा कुसवली,नागाथली परिसरात दर्शन होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.काही दिवसापूर्वी बिबट्याने येथील चार बकऱ्या ,शेळ्या यावर हल्ला केला होता. त्यात चार बकऱ्यांचा जीव गेला होता.
बिबट्याच्या दर्शनाने नागरिकांमध्ये मोठी घबराट असून भीतीचे वातावरण आहे .वन विभागाने या बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी वाढू लागली आहे. शुक्रवारी सायंकाळी सातच्या सुमारास हा बिबट्या नागाथली जवळील तीव्र वळणावर एका शासकीय अधिकाऱ्याला दिसला , तर याच सुमारास एका वाहन चालकाने या बिबट्याला पाहिला.
ही माहिती नागरिकांपर्यंत पोहोचताच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. अनेक नागरिकांनी वन विभागाला याबाबतची कल्पना दिली, असता नागरिकांनी खबरदारी घ्यावी. या परिसरात फटाके वाचून आवाज करावा आणि विनाकारण अंधारात फिरू नये, असा सल्ला दिला वन विभागाचे अधिकारी यांना संपर्क साधला असता उद्या या परिसराची पाहणी करून सत्य परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घेतला जाईल असे आश्वासन नागरिकांना दिले.
या भागातील रात्रपाळी वरून जाणाऱ्या कामगारांनी खबरदारी घ्यावी कामगारांनी एकटे एकटे न जाता समूहाने जावे अशी सल्ला ज्येष्ठ नागरिक देत आहेत. मागील दोन वर्षापासून सह्याद्रीच्या या डोंगरात बिबट्याचा वावर सुरू असल्याच्या चर्चेला उधाण होते. मात्र आता प्रत्यक्ष दर्शिनी बिबट्याला रस्त्यावर फिरताना पाहिल्यावर त्यावर शिक्कामोर्तब झाला आहे. तसेच मागील आठवड्यात बिबट्याच्या हल्ल्यात चार मेंढ्या दगावल्या असल्याची घटना ताजी आहे या सर्व पार्श्वभूमीवर नागरिकांनी खबरदारी घ्यावी हाच यावरील सध्यातरी एकमेव उपाय आहे.

error: Content is protected !!