मावळमित्र न्यूज विशेष:
जनसेवेचे व्रत हाती घेऊन राबणारा युवा कार्यकर्ता अशी स्वतःची ओळख करून तालुक्याच्या राजकारणात सक्रीय सहभाग असलेल्या तरूणाचा राजकीय प्रवासाचा झंझावात सुरू आहे. जनकल्याणासाठी त्याने स्वत:ला वाहून घेतले आहे.
विद्यार्थी दशेपासूनची त्याची जनसेवा बहरू लागली आहे. याच बळावर गरूडझेप घेऊन त्याला भविष्याचा वेध टिपायचा आहे, यासाठी त्याचे पाय जमिनीवर आहे. हसरा चेहरा, तोंडात साखर, शांत
संयमी, पण तितकाच बिनधास्त आणि बेफिकीर स्वभावाचे बळ त्याच्या पाठीशी आहे. ग्रामीण अडीअडचणींवर तो आवाज उठवतो. नाणे मावळातील कांबेगावचा तरुण कैलास बबनराव गायकवाड असे या तरूण सहकारी मित्राचे नाव. त्याचे शिक्षण एम.कॉम
डी.आय.टीपर्यंत झालेले. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक
शाळेत शिक्षणाचा पहिला श्रीगणेशा या तरुणाने बालवयातच गिरवला.
शाळेच्या मैदानातच खेळाची आवड जोपासली. जोर बैठका मारून व्यायामाचे धडे गिरवले. पुढे कुस्ती.आणि क्रिकेटचे मैदान गाजवले. संघटन कौशल्याने अनेक मित्र मिळविले..वडील बबनराव भिकाजी गायकवाड रेल्वे खात्यात नोकरीला असले, तरी पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेली शेती आणि तिला दूध
व्यवसायाची जोड होती. शेत मालाला आणि दुधाला किंमत ठरवण्याचा अधिकार शेतकऱ्याला नव्हता. याही परिस्थितीत त्याने जिद्द सोडली नाही. ग्लोडन करंजगाव, व्हीपीएस लोणावळा, इंद्रायणी महाविद्यालय तळेगाव
दाभाडे येथे शिक्षणाची एकेक पायरी चढले. पिंपरी-चिंचवड शहरात इन्फर्मेशन टेक्नॉलॉजीची पदवी मिळवली.
भाऊ यशवंत बबनराव गायकवाड ग्रामपंचायतीत दहा वर्षे निवडून.आले होते. त्यांना उपसरपंचपदाची संधी मिळाली होती. तालुक्यातीलकाँग्रेस विचार धारा असलेल्या लोकप्रतिनिधी आणि मातब्बर मंडळीचे.घरी येणे जाणे होते. त्यामुळे आपसूकच विद्यार्थी दशेपासून.राजकारणाची आवड होती. विद्यार्थी दशेत लोकनेते पद्मविभूषण आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेब व महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विचाराचा पगडा मनावर खोलवर बिंबला. विद्यार्थी चळवळीत स्वतःला झोकून
दिले. विद्याथ्यांना मदतीचा हात दिला.
ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी तत्पर पुढे असायचा.ग्रामीण भागात जोडलेली नाळ पाहून त्याच्यावर राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी दिली. तीन वर्षांच्या या काळात प्रत्येक.दिवस विद्यार्थी काँग्रेससाठी खर्च झाला. वाड्यावस्त्या पिंजून काढल्या.लोकसंग्रह वाढवला. जीवाभावाचे मित्र जमवले. त्यांच्या सुख-दुःखात.सहभागी झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी आली.
आजमितीस राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्षपदावर कैलास गायकवाड काम करीत आहेत. तालुका भर फिरत आहे. पक्ष संघटना.बळकटीसाठी विविध उपक्रम राबवून प्रेरणा आणि प्रोत्साहन देत आहे. गावागावातील प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवत आहे. ग्रामीण भागाला न्याय देण्यासाठी धडपड सुरू आहे. युवक एकता.सामाजिक संघटनेशी नाळ जोडलेली आहे. मावळ युवा पर्व फाउंडेशनचा
संस्थापक अध्यक्ष या नात्याने सामाजिक उपक्रमावर जोर आहे. सामाजिक.हिताचे उपक्रम राबवित आहे. वृक्षारोपणासाठी झोकून दिले आहे. कोरोना.काळात अनेकांना निरपेक्ष मदत केली आहे. रुग्णांचे मनोबल वाढविले.आहे. रेमडेसिव्हिर, प्लाझ्मा, ऑक्सिजन बेडसाठी केलेली धावाधाव.अनेकांना ठाऊक आहे. हे सगळे करताना कशाची अपेक्षा ठेवली नाही.
लोकसेवा सर्वसामान्यांपर्यंत कधीच पोहचली आहे. ग्रामशिक्षण समितीचे.अध्यक्षपद भूषविले आहे. शिक्षण व्यवस्थेला न्याय दिला आहे. त्यांच्या.पत्नी तृप्ती कैलास गायकवाड या कांबे कोंडिवडेच्या सरपंच होत्या. भाऊ
यशवंत बबनराव गायकवाड उपसरपंच होते..संघटनेसाठी राबणारा आणि.गाव पातळीवरील कारभाराची जाणीव असलेल्या या तरुणाला संधीची
अपेक्षा आहे.यापूर्वी वडेश्वर पंचायत समिती गणातून दोन वेळा कैलास गायकवाड.यांनी उमेदवारी मागितली होती. पक्ष आदेश मानला. आता जिल्हा.परिषदेच्या निवडणुकीसाठी संधी मिळेल अशी अपेक्षा आहे. या भागाचे.प्रतिनिधित्व अनेक मातब्बर मंडळीनी केले. काँग्रेस आणि त्या पाठोपाठ
राष्ट्रवादी काँग्रेसचा हा बालेकिल्ला. बहुअंगाने या मतदार संघाचा विकास.झाला आहे. अनेक शाश्वत विकासाची कामे मार्गी लागली आहेत. विकास कधीच थांबतो नसतो. कालची परिस्थिती बसलेली असते, हा
निसर्गाचा नियम येथेही आहे. बदल्या काळानुरूप भविष्याचा वेध घेत या.मतदारसंघाला उंचीवर नेहण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचा विश्वास
आणि श्रद्धा या तरुणाची आहे.

error: Content is protected !!