टाकवे बुद्रुक:
मावळ विधानसभेचे आमदार सुनिल शेळके यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून कुसूर येथील युवा उद्योजक अंकूश तुर्डे यांच्या सौजन्याने दूर्गम भागातील कुसूर व मोरमारेवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी झालेल्या कार्यक्रमात कुसूर शाळेच्या मुख्याध्यापिका.सुजाता भोसले,युवा नेते श्री.नितीन पिंगळे,शिक्षक .उमेश माळी व राजू वाडेकर उपस्थित होते.
कुसूर येथील शाळेत झालेल्या छोटेखानी कार्यक्रमात एकरेघी,दुरेघी,चौकटीच्या वह्या,पेन,पेन्सिल इ.साहित्याचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.शासनाकडून विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व गणवेश मोफत दिले जातात.परंतू आर्थिक दुर्बलतेमुळे दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना शालेय अभ्यासासाठी वह्या व इतर शैक्षणिक साहित्य पुरवणे पालकांना शक्य होत नाही.
शेळके यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप केले अशी प्रतिक्रिया तुर्डे यांनी दिली.शालेय साहित्य प्राप्त झाल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीतील अडथळा दूर होण्यास मदत होईल असे मत मुख्याध्यापिका सौ.सुजाता भोसले यांनी व्यक्त केले.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.उमेश माळी तर आभार श्री.राजू वाडेकर यांनी मानले.मोफत शालेय साहित्य प्राप्त झाल्यामुळे दोन्ही शाळेतील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले.

error: Content is protected !!