
टाकवे बुद्रुक:
टाकवे बुद्रुक येथील पिण्याचे पाणी पिण्यास योग्य असल्याचा निर्वाळा भूजल सर्वेक्षण विभागाने दिला आहे. टाकवे बुद्रुक येथील पिण्याचे पाणी पिण्यास अयोग्य असल्याची अफवा शहरात पसरवण्यात आली होती.
नागरिकांमध्ये गैरसमज पसरवण्याने शहर भर पिण्याच्या पाण्या बाबत अनेक शंका कुशंका आणि अफवांना उधाण आले होते. त्यामुळे नागरिकांच्या मनातील भीती काढण्यासाठी ग्रामपंचायतीने तातडीने पाणी परिक्षण करून घेतले , भूजल सर्वेक्षण व विकास योजना
पिण्यास योग्य पाणी असल्याचा दाखला १८.१०.२०२१ला दिला.
टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतील नागरिकांनी पिण्याच्या पाण्या बाबतीत कोणतेही काळजी करू नये,अफवांवर विश्वास ठेवू नये. विनाकारण गावात कोणी अशा अफवा पसरवून गावकऱ्यांच्य मनात भीतीचे वातावरण करताना कोणी आढळले तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशारा सरपंच भूषण असवले यांनी दिला. प्रसंगी या बाबतीत ग्रामपंचायतीची मानहानी करीत असल्याचा दावा ठोकण्याचा गर्भित इशारा द्यायला सरपंच असवले विसरले नाहीत.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप



