मुंबई:
|| उठूनी वेगेसी | चला जाऊ राऊळाशी | जळती पातकांच्या राशी | काकड आरती देखिलिया||
|| उठोनिया पहाटे | विठ्ठल पहा उभा विटे | चरण तयाचे गोमटे | अमृत दृष्टि अवलोका ||
कांदिवली मुंबई येथे
कार्तिक स्नान काकड आरती सोहळा संपन्न होत आहे. कार्तिक स्नान व काकड आरती सोहळा ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळ व ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था यांच्या संयुक्त अतिशय भक्तीमय वातावरणात संपन्न होत
आहे कार्यक्रमाचा कालावधी बुधवार दिनांक २०/१०/२०२१ ते* *२१/११/२०२१ पर्यत साजरा होत आहे.गेले २५ वर्षे ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळाला सोसायटीने या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद दिला. आपल्या सोसायटीचे संस्थांपक आदरनीय श्री. रवी मुंढे व त्यांच्या पत्नी सौ.रेश्मा मुंढे (ओम साई महीला मंडळ अध्यक्षा) व सोसायटीतील सर्व पदाधिकारी सभासद सोसायटीच्या प्रत्येक कार्यक्रमाला चांगले सहकार्य करत असतात.
कार्यक्रमाची रुपरेषा पुढील प्रमाणे असणार आहे.काकड आरती सोहळा सन – २०२१.नेहमी प्रमाणे दि. २०/१०/२०२१ रोजी पहाटे ४.३० वाजता टाळ , विणा , पखवाज पुजन करुन कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली.व ओम साई वारकरी सांप्रदायिक भजन मंडाळातील सर्व सभासद व ओमसाई आरती महिला मंडळ उपस्थित राहुन कार्यक्रमाची शोभा वाढविली.
•किर्तन महोत्सवाची रूपरेषा
•बुधवार दि:१७/११/२०२१ रोजी पहिल्या किर्तनाचा कार्यक्रम संध्याकाळी ८ ते १० या वेळेत होईल.*
•बुधवार दि:१७/११/२०२१ रोजी ह.भ.प.निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर)*
• गुरूवार दि:१८/११/२०२१रोजी ह.भ.प.अशोक महाराज पांचाळ (आळंदी देवाची)
• शुक्रवार दि:१९/११/२०२१रोजी ह.भ.प.सागर‌ महाराज शिर्के (शिरगाव आळंदी)
•शनिवार दि:२०/११/२०२१रोजी ह.भ.प.गोविंद महाराज गोरे(आळंदी देवाची)
जागर:
• रविवार दि:२१/११/२०२१ रोजी काल्याचे किर्तन ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज कदम‌ छोटे माऊली (आळंदी देवाची) असे नियोजन वरील मंडळाने नियोजित केले आहे.
•गोरक्षनाथ भजन मंडळ गोराई*
•नवखंडेनाथ भजन मंडळ कांदरपाडा दहीसर*
•विठ्ठल रुक्मिणी भजन मंडळ एकतानगर म्हाडा*
• नटेश्वर भजन मंडळ सातबंगला*
•मुंबई जेवन डब्बे वाहातुक मंडळ व माऊली गृप कांदीवली
•स्वरानंदी भजन मंडळ सातबंगला या मंडळाची काकड आरती साठी अतिशय छान साथ लाभते.
|| इवलेसे रोप लावियेले द्वारी | त्याचा वेलू गेला गगनावरी ||
ओमसाई वारकरी सांप्रदायिक भजन मंडळातील सर्व सभासद एकोप्याने असल्या कारणाने आज आपल्याला या मंडळाचा वटवृक्ष पाहायला मिळतो. या मंडळाने खुप मेहनत घेऊन अनेक सांप्रदायिक कार्यक्रम हाती घेऊन यशस्वीपणे संपन्न केले आहेत.
•कार्यक्रम स्थळ:
ओमसाई वारकरी सांप्रदायक भजन मंडळ व ओमसाई सहकारी गृहनिर्माण संस्था*
पत्ता :न्यु लिंक रोड मेट्रो स्टेशन डाहाणुकरवाडी कांदिवली प.मुंबई ४०००६७.

error: Content is protected !!