तळेगाव: सर्वोत्तम कँन्सर रूग्णालय म्हणून ओळखल्या जाणा-या आँन्को लाईफ कँन्सर सेंटरने वैदयकिय विश्वात कर्करुग्णांमध्ये आशेचा किरण निर्माण केला आहे. अतिशय अल्प कालावधीतच रुग्णांचा विश्वास संपादन करून नावारुपास आलेले साता-यातील आँन्को लाईफ कँन्सर सेंटरने सर्वात सुरक्षित आणि प्रगत वैद्यकीय सेवा देणारे हॉस्पिटल म्हणुन
सातत्याने परवडणाऱ्या दरात आरोग्य सेवा देत.उपचारांमध्ये रुग्णाभिमुख दृष्टीकोन ठेवत. पश्चिम महाराष्ट्रात नावलौकीक मिळविला आहे. रूग्णसेवा हा एकमेव उद्देश बाळगून आधुनिक तंत्रज्ञान आणि तज्ञ डॉक्टरांसह कोकणात आपला विस्तार करत चिपळून येथे सुविधा सुरू केली आहे. त्यानंतर ऑन्को लाईफ सह्याद्री हॉस्पिटल कराड, आणि आता नुकतेच तळेगाव येथेही टी. जी.एच-ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरचा श्री सतीश दिघे (मुख्याधिकारी तळेगाव नगर परिषद) यांच्या हस्ते तसेच ऑन्को लाईफ होस्पिटल्सचे कार्यकारी संचालक श्री सचिन देशमुख आणि संचालक डॉ प्रताप राजेमहाडिक आणि तळेगाव जनरल होस्पिटल चे अध्यक्ष श्री. कृष्णराव भेगडे(माजी आमदार) कार्याध्यक्ष श्री.शैलेश शहा, डॉ.सत्यजित वढोकर,श्री.रामदास काकडे यांच्या प्रमुख उपस्थितित शुभारंभ करण्यात आला असून या ठिकाणी कर्करुग्णांकरिता अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सेंटरच्या माध्यमातून रुग्णांमध्ये जनजागृतीपर उपक्रमही राबविले जात असून कर्करोगावर मात करण्याचे मुळ उद्दीष्ट्य समोर ठेवून रुग्णसेवा पुरविण्याचे काम केले जात आहे.ऑन्को लाईफ हॉस्पिटल्स चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री.उदय देशमुख,कार्यकारी संचालक श्री सचिन देशमुख संचालक डॉ.प्रताप राजेमहाडीक, डॉ मनोज तेजानी(चीफ ऑपरेटिंग ऑफिसर) यांचे या सेंटरकरिता विशेष योगदान आहे. टी जी एच-आँन्को लाईफ कँन्सर सेंटर येथे अद्ययावत तंत्रप्रणालीसह, अनुभवी डाँक्टरांच्या सहाय्याने , केमोथेरपी व शस्त्रक्रियेची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. या सेंटरमध्ये ओपीडी, सुसज्ज ऑपरेशन थियेटर, प्रतिक्षा विभागाचा समावेश आहे. तसेच, ज्या रूग्णांची आर्थिक स्थिती कमकूवत आहे अशा रूग्णांना सरकारच्या महात्मा ज्योतीबा फुले जनआरोग्य योजनेचा लाभ घेऊन उपचार घेण्याची सुविधा लवकरच उपलब्ध होणार आहे.तसेच रेडिएशन ची सुविधाही उपलब्ध होणार आहे कर्करोगाचे वेळीच निदान होऊन त्वरीत उपचारही सुरू होऊ शकतील आणि त्यादृष्टीने टी जी एच-आँन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून कर्करूग्णांमध्ये एक विश्वास निर्माण करत टी. जी.एच- ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरची सुरूवात करण्यात आली आहे.सेंटरमधील डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि इतर कर्मचारी हे उच्च दर्जाचे प्रशिक्षण घेतलेले कॅन्सर तज्ञ आहेत गुणवत्ता, देखभाल आणि प्रभावी उपचार यासाठी हे सेंटर विशेष ओळखले जाते.पुर्वी कर्करोग म्हटल्यावर रूग्ण आणि नातेवाईक पुर्णत: कोलमडून जायचे परंतू आता जनमानसात त्याबद्दल झालेली जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे या रूग्णांचे जीवनमानही वाढले आहे. अधिकाधिक जनजागृती करण्याचा प्रयत्न या सेंटरच्या माध्यमातून केला जात आहे.

error: Content is protected !!