मावळ मित्र न्यूज विशेष…


“माझ्या माय माऊलींच्या डोक्यावरील पाण्याचा हंडा उतरवीन आणि माझ्या मावळच्या जनतेच्या सुखदुःखात सहभागी होऊन त्यांची दुःख हलकं करण्यासाठी रात्रंदिवस राबत राहील” हा शब्द खरा करणारे लोकप्रिय आमदार म्हणजे सुनिलआण्णा शेळके.
मावळच्या माय माऊलींचे खरे पाठीराखे आहेत.त्यांच्या धडाकेबाज नेतृत्वाने मावळातील चोपन्न गावांच्या पाणी पुरवठा योजना मार्गी लागल्या.त्यांच्याच पुढाकाराने कान्हे व लोणावळा येथे ग्रामीण भागातील जनतेसाठी जिल्हा उपरुग्णालय उभे राहत आहे. त्यात अनेक गोरगरीब गरजूंना सवलतीच्या दरात मोफत औषध उपचार केले जाणार आहेत.

आमदार सुनिल शेळके यांचा झंझावात मावळत्या जनतेने दोन वर्षात अनुभवला आहे.तत्पूर्वी ‘स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान’च्या वतीने सुरू केलेली अण्णांची सामाजिक उपक्रमांची रेलचेल हीदेखील मावळवासीय यांनी अनुभवली आहे.दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावर घेऊन जायचं आणि त्यांना पुन्हा घरी सुरक्षित घेऊन जायचं ही त्यांनी केलेलं कामे दहावी-बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण होऊन करिअर केलेल्या तरुण पिढीने अनुभवली आहेत.
हीच तरुण पिढी त्यांच्या पाठीशी ताकदीने उभी राहिली.मावळ तालुक्याच्या वाडीवस्तीवर,खेड्यापाड्यात ‘महिला प्रशिक्षण शिबिरे’ राबवून शिवण क्लासेस राबवली व अनेक भगिनींच्या हाताला त्यांनी कामे मिळवून दिली.अनेक गरजू माता-भगिनी यातून भुकेलेल्याची भूक आणि तहानलेल्याची तहान जाणून त्यांनी गोरगरिबांची सेवा केली.या सेवेच्या पुण्यातून त्यांनी घेतलेला दुवा त्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर घेऊन गेला.
राज्यात त्राण्णव हजाराच्या फरकाने निवडून आलेले आण्णा आजही जमिनीवर पाय ठेवून आपले जनसेवेचे व्रत अत्यंत जबाबदारीने पार पाडीत आहेत.कोरोना महामारीच्या संकटात मावळचे कुटुंब प्रमुख म्हणून त्यांनी पार पाडलेली जबाबदारी मावळची जनता कधीच विसरणार नाही.शासकीय योजना माझ्या सर्व सामान्य गोरगरीब माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजेत यासाठी असलेला त्यांचा अट्टाहास आणि तळमळ ही सर्व मावळवासीय वेळोवेळी अनुभवत आहेत.आज त्यांचा वाढदिवस.. या वाढदिवसाला मावळ तालुक्यातल्या प्रत्येक नागरिकाकडून त्यांना शुभेच्छांचा भरभरून वर्षाव होतोय.आपला वाढदिवस साजरा करताना पुष्पगुच्छ,केक न आणता आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा पाठीशी असाव्यात एवढीच अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे.
लोकसेवेचा घेतलेला वसा चिरकाल टिकून ठेवण्यासाठी त्यांच्या राबणाऱ्या हातांना परमेश्वराने बळ द्यावे, शक्ती द्यावी अशीच या वाढदिवशी त्यांना शुभेच्छा व्यक्त केली जात आहे.मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील लहानसहान खेड्यांच्या विकासासाठी ते झटत आहेत.अनेक शेतकऱ्यांना समूह पाणीपुरवठा योजनेतून शेतीच्या बांधापर्यंत पाणी पोहचवून समृद्ध शेतकरी करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.त्यांनी आजवर अनेक गावांच्या धार्मिक स्थळांच्या जीर्णोद्धारासाठी मोलाची मदत केलेली आहे.शाळा, महाविद्यालये,जिम,व्यायाम शाळा यासाठी त्यांनी सढळ हाताने केलेली मदत विसरता येणार नाही.वैयक्तिक कामाच्या जोरावर जनाधार मिळवलेल्या या लोकनेत्याने फार कमी कालावधीत ‘मावळचा कुटुंबप्रमुख’ ही जबाबदारी सहजरित्या पेलली आहे.’जनसेवक’ ही बिरुदावली त्यांना शोभून दिसते.
महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यावर दोन वर्षात सुमारे साडेसातशे कोटी रुपयांची विकास कामे मंजूर करून त्यांनी मावळच्या विकासाचा बॅक लॉक भरून काढायला सुरुवात केली. ग्रामीण भागातील रस्ते,त्यांचे रुंदीकरण,ब्रिटिशकालीन पूल, आरोग्य मंदिरे,दिडशे वर्षांपूर्वीची तहसीलदार कचेरी पाडून एकाच छताखाली बांधण्यात येणारी प्रशासकीय इमारत मावळच्या वैभवात भर घालणारी आहे.माय माऊली यांचाआशीर्वाद,तरुणांचा विश्वास,जेष्ठांचा आधार अशा चौफेर बाजूने जनसंपर्काचे पैलू जपणाऱ्या लोकनेत्याला जन्मदिनाच्या निमित्ताने मावळच्या माय माऊलींकडून भरभरून शुभेच्छा !!!
शेवटी एकचं….
“एक एक पायरी तो चढे भरभर….
सुनिलआण्णा शेळके दादा एक नंबर…”
( शब्दांकन- सविता भांगरे,सरपंच निगडे)

error: Content is protected !!