टाकवे बुद्रुक:
जग कोविड सोबत संघर्ष करत असताना, दुर्लक्ष झाले ते अन्य आजरांकडे.त्याच आजरांनपैकी लोकांना असेकाही आजारांना तोंड द्यावं लागतं जे कुणाला लवकर सांगता ही येत नाही आणि लपवता ही येत नाही.
या दोन वर्षांच्या काळात,परिस्थिती मूळे बदललेली जीवनशैली आणि आहरामुळे मूळव्याध,फिस्टुला, भगंदर, बांधकोष्टाता असलेल्या रुग्णांमध्ये वाढ दिसली. त्यापैकी बहुतेक लोक कोरोनाव्हायरसच्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय सेवेला विलंब करताना दिसलेच व ह्या वर घरगुती उपचार घेण्याचे प्रयत्न करून परिणामी योग्य उपचारानंपासून दूर राहिले.
ही गोष्ट लक्षात घेऊन डॉ अश्विन पोरवाल (संस्थापक-अध्यक्ष, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन ) व डॉ स्नेहल पोरवाल (संस्थापक-सचिव, हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन )यांनी टाकवे बु,तालुका मावळ येथे हीलींग हँड्स फाउंडेशन व , शिवाजी असवले मित्र परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने, मुळव्याध, बद्धकोष्ठता, हर्निया, भगंदर, व्हेरीकोस व्हेन्स व इतर पोटाचे विकार यावर तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत तपासणी व मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात आले होते.
सदर शिबिरास ,हिलींग हँडस फाउंडेशन तर्फे मधुरा भाटे (संस्था समन्वयक) यांनी रुग्णांना तपासले व आहार कसा असावा याविषयी माहिती दिली , अनिता सैद (शिबीर व्यवस्थापक)यांनी शिबिराचे सर्व नियोजन केले, तेजश्री खलाटे यांनी समुपदेशन केले व औषधे दिले,आनंद मिसाळ,शकील शेख, यांचे शिबिरास मोलाचे सहकार्य लाभले.
मावळचे लोकप्रिय आमदार जनसेवक सुनील अण्णा शेळके वाढदिवसानिमित्त शिवाजी असवले,रामदास वाडेकर यानी या शिबिरासाठी सहकार्य केले.
शिबिरात 56 रुग्णांची मोफत तपासणी करण्यात आली.औषध वाटप करण्यात आले. ह्या आजरांविषयी योग्य माहिती व मार्गदर्शन घरोघरी पोहोचवण्याचा हीलिंग हॅण्डस फॉउंडेशन चा प्रयत्न आहे.

error: Content is protected !!