टाकवे बुद्रुक:
आंदर मावळातील खांडी व वडेश्वर केंद्रातील दुर्गम भागातील विविध शाळांमधील गरीब व होतकरु विद्यार्थ्यांना तळेगांव दाभाडे येथील ‘सामाजिक सहयोग व उपक्रम संस्था’ यांजकडून मोफत स्वाध्यायपुस्तक वाटप करण्यात आले..यावेळी संस्थेच्या अध्यक्षा नयना आभाळे,सहकारी अर्चना जोशी,वृषाली बनकर तसेच सर्व शाळांमधील मुख्याध्यापक व शिक्षक वृंद उपस्थित होते.
या संस्थेकडून यापूर्वी दुर्गम भागातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्या व शालेय साहित्य वाटप,आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना दिवाळी फराळ वाटप,वीटभट्टीवरील कामगारांच्या मुलांच्या शैक्षणिक अडचणी दूर करुन शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देणे तसेच कळकराई येथे मेडिकल कँम्पचे आयोजन असे विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात आलेले आहेत…गेली १० वर्षे २२००० वह्यांचे वाटप करुन या संस्थेने सामाजिकता जपत नवीन आदर्श निर्माण केलेला आहे…
आंदर मावळातील खांडी,कुसूर,मोरमारेवाडी (कुसूर),बेंदेवाडी,डाहूली,कांब्रे,बोरवली,कांब्रे पठार,वहानगांव,कुसवली,नागाथली,शिंदेवाडी,वडेश्वर,सटवाईवाडी,लष्करवाडी,मोरमारेवाडी,माऊ,दवणेवाडी या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत स्वाध्यायपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
संस्थेच्या या समाजशील उपक्रमाचे केंद्रप्रमुख श्री.रघूनाथ मोरमारे व श्री.गंगाराम केदार यांनी कौतूक केले..स्वाध्यायपुस्तक मिळाल्याने कोवीडमुळे शिक्षणापासून दुरावलेले विद्यार्थी शिक्षणप्रकियेत सहभागी होऊन विद्यार्थ्यांच्या प्रगतीत वाढ होण्यास निश्चित मदत होईल अशी प्रतिक्रिया सौ.सुजाता भोसले व श्री.गोकूळ लोंढे यांनी व्यक्त केली…संस्थेच्या या विद्यार्थीहीत दक्ष उपक्रमामुळे विद्यार्थी सुखावले आहेत असे मत श्री.सुनिल साबळे व श्रीम.शुभदा वैद्य यांनी व्यक्त केले.

error: Content is protected !!