वडगाव मावळ:
वाढदिवसाला पुष्पगुच्छ, केक न आणता आपल्या सर्वाचे आशीर्वाद व शुभेच्छा द्याव्यात असे आवाहन मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी केले. २० ऑक्टोबर या दिवशी आमदार शेळके यांचा वाढदिवस या वर्षाच्या वाढदिवशी केक,पुष्पगुच्छ न आणता आणता समर्थकांसह नागरिकांनी शुभेच्छा व शुभाशीर्वाद असे आवाहन करताना आमदार शेळके म्हणाले,”उद्या २० ऑक्टोबर माझा वाढदिवस,माझ्या वाढदिवसानिमित्त आपण सर्वजण मला आशीर्वाद व शुभेच्छा देण्यासाठी येत असता.
परंतु उद्या २० ऑक्टोबर २०२१ रोजी आपले लाडके उपमुख्यमंत्रीमा.ना.अजितदादा पवार मावळातील विविध विकास कामांच्या उद्घाटनासाठी येत आहेत.त्यामुळे दिवसभर त्यांच्यासोबत कार्यक्रमांना उपस्थित राहणे गरजेचे आहे. मात्र आपल्या सर्वांच्या भावनांचा आदर ठेऊन उद्या सायंकाळी जाहीर सभेनंतर वडगाव मावळ येथे आपल्या आगमनापर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी
उपस्थित राहणार आहे.
परंतु वेळेची मर्यादा व गर्दीचे प्रमाण लक्षात घेऊन आपण
कोणतीही भेट पुष्पगुच्छ, केक आणू नयेत.आपल्या शुभेच्छा व आशीर्वाद.माझ्यासाठी कुठल्याही भेटवस्तुपेक्षा मौल्यवान आहेत. आपल्या सर्वांच्या अंतकरणात माझ्याविषयी असलेल्या जिव्हाळ्याच्या भावनांची मला पूर्ण जाणीव आहे. व त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. आपण मला समजून घेऊन सहकार्य कराल,अशी अपेक्षा बाळगतो.
-आपला सुनिल शंकरराव शेळके.

error: Content is protected !!