वडगाव मावळ:
मावळ तालुक्याचा पंधरा ते वीस वर्षातील विकासाचा बॅक लॉक भरून काढण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुमारे साडेसातशे कोटी रुपयांचा विकास निधी देऊन मावळा ला झुकतं माप दिलं आहे. त्या बद्दल अजित दादा पवार यांचे आभार मानण्यासाठी होणाऱ्या ऐतिहासिक कार्यक्रमाचे साक्षीदार होण्यासाठी मावळातील जनतेने वडगाव मावळ येथील जाहीर सभेत उपस्थित राहावे असे आव्हान मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केले.
राष्ट्रवादी काँग्रेसची ची स्थापना झाल्या नंतर सुनील शेळके यांच्या रूपाने घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवून मोठ्या मताधिक्क्याने विजयी झाल्या नंतर आमदार शेळके यांच्या पुढाकाराने मावळ तालुक्यातील लोणावळा, कामशेत, कान्हे,वडगाव मावळ येथील विविध विकास कामांचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शुभहस्ते होणार आहे.
तद नंतर वडगाव मावळ येथे जाहीर सभा होणार असून तालुक्यातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आव्हान आमदार शेळके यांनी केले. लोणावळा शहरात जिल्हा उपरुग्णालय, कान्हे फाटा येथे जिल्हा रुग्णालय, नाणे मावळाला जोडणाऱ्या नाणे उड्डाणपूल व जांभवली रस्त्याचे भूमिपूजन. टाकवे बुद्रुक येथील ब्रिटिश कालीन मुलाच्या पुलाचे भूमिपूजन तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात बांधलेल्या वडगाव मावळ येथील तहसीलदार कचेरी पाडून तेथे उभारण्यात येणाऱ्या प्रशासकीय इमारतीचे भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहे.
अ पवन मावळातील पवना नदीवरील चार पुलांचे व इतर कामांचे ऑनलाईन भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार असून यासाठी मावळ नगरी अक्षरशा सजली आहे.पुणे मुंबई महामार्ग ,द्रुतगती महामार्ग, वडगाव, तळेगाव, लोणावळा,देहूरोड,कामशेत यासह ग्रामीण भागातील गावागावात फ्लेक्स लावून या कार्यक्रमाची जय्यत तयारी दिसू लागली.
उपमुख्यमंत्री अजित पवार सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांचे पंचवीस फूट उंचीचे होर्डिंग लावून या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित केलं गेलं .मावळ तालुक्यातील नागरिकांना या ऐतिहासिक कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी महसूल भावनाची जुनी इमारत काढून तेथे भव्य मंडपाचे काम प्रगतीपथावर असून सुमारे नऊ हजार नागरिक बसतील अशी बैठक व्यवस्था या प्रशस्त मंडपात केली जात आहे यासाठी कारागीर रात्रंदिवस काम करीत असून कार्यक्रमाच्या सुनिश्चित नियोजनासाठी आमदार सुनिल शेळके रात्रीचा दिवस करून झटत आहेत .
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं राज्यातील महत्त्व आणि कामांचा झंजावात पाहता पवार यांचे स्वागत तितक्याच दिमाखात करण्याचं नियोजन सुनील शेळके यांनी केलेले दिसते. लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा पुष्पहार अर्पण करून विकासकामांच्या भूमिपूजनाला सुरुवात करण्यात येणार आहे .हलगी तार्‍याचा निनाद ढोल-ताशांचा गजर फटाक्यांची आतिषबाजी यात पवारांचं जोरदार स्वागत केले जाणार आहे .या ऐतिहासिक सोहळ्याची ची तयारी करीत असताना नागरिकांनी मास्क लावून यावे अशी सूचना आमदार शेळके यांनी कार्यकर्त्यांना दिली आहे. मागील पंधरवड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने अजित पवार यांची या कार्यक्रमासाठी वेळ मागितली होती
बुधवारी हा कार्यक्रम असून दर बुधवारी कॅबिनेटची बैठक होते या बैठकीची वेळ बदलून सकाळच्या पहिल्या सत्रात ही बैठक घ्यावी अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती, कॅबिनेटची बैठक वेळ बदलून सकाळच्या सत्रात घेतली आहे मावळातील या ऐतिहासिक सोहळ्यासाठी कॅबिनेटच्या वेळे कॅबिनेटच्या बैठकीच्या वेळेत बदल केला या सभेचे महत्व अधोरेखित होत आहे .मावळ तालुक्याच्या इतिहासातील हा अत्यंत महत्वाचा दिवस असणार आहे.
स्वातंत्रपूर्व काळातील तहसील कचेरी पाडून एकाच छताखाली सर्व प्रशासकीय कारभार चालावा यासाठी बांधल्या जाणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन ,ब्रिटिश कालीन पूल,दोन जिल्हा रुग्णालये,ग्रामीण भागाला जोडणारे रस्ते, पवना नदीवरील पूल ही सगळी कामे तालुक्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. या कामासाठी पवार यांनी केलेल्या मदतीचा हा आभार सोहळा तितक्याच दिमाखात साजरा करण्याचा मानस दिसतोय.याच दिवशी आमदार सुनिल शेळके यांचा वाढदिवस असून शेळके समर्थ समर्थक कार्यकर्त्यांनी अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या दिमाखात साजरा करण्याचं नियोजन केलं असलं ,तरी आमदार सुनिल शेळके यांनी कार्यकर्त्यांना हा ऐतिहासिक सोहळा तालुक्याच्या विकासाचा सोहळा असल्याचे सांगून आपल्या वाढदिवसाला येताना पुष्पगुच्छ,हारतुरे,केक न आणता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी रुबाबात यावं ,आणि मावळची जनता उपमुख्यमंत्री पवार यांच्यावर किती निष्ठेने प्रेम करते हे दाखवून द्यावं असे आव्हान शेळके यांनी केले.

error: Content is protected !!