वडगाव मावळ:
लोकनेते राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा करावा असे आव्हान मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले .लोकनेते पवार यांचं ८१ व्या वर्षात पदार्पण झाले आहे .
पवार यांनी आत्तापर्यंत ९९९ पौर्णिमेचा चंद्र पाहिला आहे .यंदाची कोजागिरी पौर्णिमा शरद पौर्णिमा म्हणून ओळखली जाणार आहे .या पौर्णिमेचा१००] वा चंद्र पवार पाहणार आहेत. सहस्रचंद्रदर्शन सोहळ्याचे महत्व अधोरेखित असताना शाहू, फुलेस आंबेडकर यांचा वसा आणि वारसा जपणाऱ्या पवारांचा सहस्त्र चंद्र दर्शन सोहळा सामाजिक उपक्रमांनी साजरा करताना मावळ तालुक्यातील प्रत्येक गावागावात ग्रामदेवता यांना अभिषेक करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पवारांना आरोग्यदायी दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा देऊन हा सहस्रचंद्रदर्शन सोहळा साजरा करण्याचे आव्हान भेगडे यांनी केले.
याच अनुषंगाने मावळ तालुक्याचे ग्रामदैवत असलेल्या पोटोबा महाराज मंदिरात सकाळी सहा वाजता अभिषेक केला जाणार असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने १००० पेढ्यांचे वाटप केले जाणार आहे. तसेच तळेगाव दाभाडे येथील डोळसनाथ महाराज सइंदुरी चे ग्रामदैवत कडजाई मातास सोमाटणे चे ग्रामदैवत चौराई माता, श्रीक्षेत्र एकविरा देवी सी क्षेत्र अशा तालुक्यातील सर्व मंदिरात पवारांच्या सहस्रचंद्रदर्शन सोहळा निमित्त अभिषेक सोहळे पार पडणार असून समाजातील गरजूंना मदतीचा हात दिला जाणार आहे.
टाकवे बुद्रुक येथे शिवाजीराव असवले मित्र परिवाराच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे लोकनेते पवार यांच्यावर मोठी श्रद्धा असणाऱ्या कार्यकर्त्यांची फळी मावळ तालुक्यात असून पवारांचा सहस्त्रचंद्रदर्शन सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यासाठी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत मंगळवार दिनांक १९ ला कोजागिरी पौर्णिमा असून पवार त्यांच्या आयुष्यातील १०००वी पौर्णिमा पाहणार आहेत. पवार यांच्या सहस्त्र दर्शन सोहळा सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यासाठी राष्ट्रवादी कार्यकर्ते रावत आहेत.

error: Content is protected !!