कामशेत:
कोरोना संकटात अठरा अठरा तास काम करून अनेक रूग्णांवर उपचार करणाऱ्या डाॅ.विकेश मुथा यांचे कार्य कौतुकास्पद आहे,कोरोनाच्या संकटात काम करणारे आरोग्य दूत समाजासाठी प्रेरणादायक आहे,त्यांचा आदर करा असे आवाहन शिवसेनेचे माजी आमदार तुकाराम काते यांनी केले
कामशेत येथील महावीर हाॅस्पिटलला काते यांनी भेट देऊन महावीर हाॅस्पिटलचे सर्वेसर्वा डाॅ.विकेश मुथा,महावीर हाॅस्पिटलचे कर्मचारी,वार्ड बाॅय,परिचारिका यांचे त्यांनी कौतुक केले.
डाॅ.विकेश मुथा,खडकाळा ग्रुप ग्रामपंचायतीच्या सदस्या अंजना मुथा,निलेश मुथा या मुथा परिवारातील सदस्यांनी माजी आमदार काते यांचा पारंपारिक पद्धतीने औक्षण करून सन्मान केला.
यावेळी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख गणेश भोकरे, शिवसेनेचे शहरप्रमुख सतीश इंगवले,सुदेश लाड,तालुका उपप्रमुख राजू आंद्रे उपस्थितीत होते. अठरा तास काम करून आलेल्या कष्टाने डाॅ. विकेश मुथा यांना झालेल्या त्रासाबद्दल व त्यावर केलेल्या उपचाराची माहिती माजी आमदार काते यांनी समजून घेऊन त्यांनी स्वतःचा अनुभव सांगून राबणा-या मुथा यांच्या हाताला अधिक बळ देण्याच्या शुभेच्छा दिल्या.

error: Content is protected !!