वडगांव मावळ:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त युवा पर्व फाउंडेशन मावळ व कैलासभाऊ गायकवाड मित्र परिवाराच्या वतीने “खेळ रंगला पैठणीचा” हा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. पिंपरी येथे महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. महिलांसाठी खास आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली होती.
चुल आणि मुल या चौकटीतून बाहेर येण्यासाठी आणि ग्रामीण भागातील महिलांना कष्टाच्या कामातून थोडा विसांत मिळावा हा हेतू ठेवून ग्रुप ग्रामपंचायत माळेगाव विद्यमान सरपंच रोहणी राजेश कोकाटे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन नियोजन केले होते.
या कार्यक्रमासाठी उपस्थित मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस अध्यक्ष, युवा पर्व फाऊंडेनचे संस्थापक कैलास गायकवाड यांनी सर्वांना मार्गदर्शन व शुभेच्छा दिल्या. गुलाबराव गभाले माजी सरपंच वडेश्वर यांनी विशेष सहकार्य केले.
अनंता पावशे – विद्यमान सरपंच खांडी, बाळासाहेब दाते विद्यमान सरपंच कुसवली,.युवा नेते अनिल जाधव,या कार्यक्रमाचे पूर्ण नियोजन माजी सरपंच राजेश कोकाटे आणि विकास सहकारी संस्थेचे सचिव अंकुश पिंपरकर आणि पोलीस पाटील रवी घोडे यांनी केले.
तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल पिंपरकर यांनी केले.
आणि या कार्यक्रमासाठी वरसुबाई तरुण मंडळाचे सर्व युवा कार्यकर्त्यांनी खुप चांगल्याप्रकारे सहकार्य केले.
साधारण ५०० महिला व पुरुष नागरिकांच्या सहभागाने हा कार्यक्रम खूप चांगल्या प्रकारे पार पडला.
पिंपरी बुद्रुक मानची पैठणी शांताबाई धनराज कोकाटे, नकुबाई गणपत वासावे (सोन्याची नथ),गौरी एकनाथ कोकाटे(प्रेशर कुकर)

error: Content is protected !!