टाकवे बुद्रुक :शुद्ध प्रतिपदेपासून विजयादशमी पर्यंत शारदिय नवरात्रोत्सव सर्वत्र साजरा केला जातो , माजलेल्या असूर दैत्यांचा नाश आई भवानीने दुर्गाष्टमीच्या दिवशी केला त्यालाच अनुसरून समाजातील राक्षसांचा संहार करण्यासाठी स्त्रीशक्तीला कणखर करण्यासाठी
दुर्गादौडचे आयोजन विश्व हिंदू परिषद बजरंग दल दुर्गा वाहीनी या संघटनांच्या माध्यमातुन केले जाते पक्ष,गट,तट,जात,पात सर्व सोडुन परम पवित्र भगव्या ध्वजाच्या मागे सकाळी लवकर ऊठुन देशभक्तिपर गीत म्हनत घटस्थापनेपासुन दस-या पर्यंत नवदुर्गांचा जागर करत नगर प्रदक्षिणा केली जाते . महिला भगव्या ध्वजाची आरती ओवाळुन पुजा करताना दिसतात यामुळे दांडीया गरबा यापेक्षा धर्म कार्यात तरून तरूणींचा ऊस्फुर्त प्रतिसाद मिळतो यावेळी हभप सोपान गुनाट व सदानंद पिलाणे सह्याद्री प्रतिष्ठान यांनी धर्म जोपासने यावर मार्गदर्शन केले व दौड समाप्ति नंतर अल्पऊपहार दिला जातो. आयोजक जिल्हा मंत्री महेंद्र असवले,निखिल भांगरे,तानाजी असवले,योगेश गुनाट,रविंद्र असवले,अक्षय काटकर,अक्षय असवले,तुषार टेमगिरे,विशाल जगताप,अदित्य धामनकर,भावना असवले,सिद्धी असवले,सिद्धी कालेकर,चंदना जगताप,तृप्ती असवले,वैष्णवी कालेकर,सई असवले,घोषना असवले,वैदांती पिलाणे यांचा सहभाग लाभला.

error: Content is protected !!