मुंबई :
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांची राज्य महिला आयोगाच्याअध्यक्षपदी निवड निश्चित झाली आहे. या पदासाठी राष्ट्रवादी च्या माजी आमदार व प्रवक्त्या विद्या चव्हाण तसेच माजी सनदी अधिकारी चंद्रा अय्यंगार यांची नावेही चर्चेत आहेत.चाकणकर यांचे नाव अंतिम करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली.
गेल्या दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते. राज्यातील महिला अत्याचाराच्या घटना एकी कडे वाढत असताना राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होतं. त्या मुळं विरोधकांकडूनही महाविकास आघाडी सरकारवर टीका केली जात होती. यापूर्वी विजया रहाटकर या महिला आयोगा चे अध्यक्ष होत्या.
लखीमपूर हिंसाचार प्रकरणावर महाविकास आघाडीने महा राष्ट्र बंद पाळला होता. त्यावेळी या निर्णयावर ‘आज वसुली सुरु आहे की बंद ? ‘असा खोचक सवाल करत अमृता फडण वीस यांनी महाविकास आघाडी सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. त्यावर चाकणकर यांनी ‘वहिनींच्या गाण्यात सुरांचा जसा ताळमेळ नसतो, तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धाआजकाल काही ताळमेळ नसतो ? संवेदनाहिन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी’, असे ट्वीट केले होते.
शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक पार पडली होती. यामध्ये पक्षाचे मंत्री आणि खासदार यांचा समावेश होता. या बैठकीत याबाबत चर्चा झाली त्यांनतर चाकणकर यांच्या नावाची राज्य महिला आयो गाच्या अध्यक्षपदासाठी शिफारस करण्यात आली. अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.
रुपाली चाकणकर या महिलांच्या प्रश्नांवर नेहमीच आक्रमक राहिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलनेही झाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसची महिला आघाडी सक्षम करण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका राहिलेली आहे. दौंड मधील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या रुपाली चाकणकर यांचा राजकीय प्रवास थक्क करणारा राहिला आहे. लग्नानंतर त्या चाकणकर कुटुंबाच्या सदस्य झाल्या आणि चाकणकर कुटुंबा ला राजकीय पार्श्वभूमी असल्याने राजकारणात उतरत त्यांनी यशही मिळवलं. नगसेविका ते राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा असा त्यांच्या यशाचा आलेख चढता राहिला आहे.
रुपाली चाकणकर सोशल मीडियावर सतत सक्रिय आहेत. सोबतच त्या महिला अत्याचार प्रकरणावर नेहमी भाष्य करत असतात. अवघ्या दीड ते दोन वर्षाच्या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेसमधील हुकमी एक्का म्हणून त्यांच्या कडे पाहिलं जात आहे. रस्त्यावरची आंदोलनं ते भव्य व्यासपीठ आणि हजारों च्या गर्दीत रुपाली चाकणकर यांचं वेगळेपण पाहायलामिळतं. विषयांची मुद्देसूद मांडणी, सडेतोड उत्तर, करारीपणा, कधी कोट्या करुन विरोधकांना नामोहरम करणं यासाठी रुपाली चाकणकर ओळखल्या जाऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाची महत्त्वाची जबाबदारी त्यांनी उत्तम रित्या पेललीय. संपूर्ण महाराष्ट्रात फिरुन राष्ट्रवादीचं महिला संघटन मजबूत करण्यावर त्यांचा भर राहिला आहे. आता राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाची मोठी जबाबदारी रुपाली चाकणकर यांच्यावर आहे.

error: Content is protected !!