पिंपरी:
नवरात्र उत्सवात संपुर्ण ९ दिवस चतुश्रुंगी पोलीस स्टेशनच्या हद्दीतील चतुश्रुंगी मंदिरातील बंदोबस्तासाठी चतुश्रुंगी पोलीसांसोबत संस्कार प्रतिष्ठानच्या २६ सभासदांना विशेष पोलीस अधिकारी म्हणून नेमले होते.
दररोज सायंकाळी ५ ते रात्री ९ वाजेपर्यंत विशेष पोलीस अधिकारी यांनी चोख बंदोबस्त केला त्याबरोबर कोरोनाचा प्रादुर्भाव असल्यामुळे दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे थर्मल स्कॕनिंग केले.सोशल डिस्टंन्सचे पालन करावे असे आवाहन केले.
चांगल्या कामाचे कौतुक म्हणून चतुश्रुंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार वाघचवरे व पोलीस निरीक्षक दादा गायकवाड यांनी सर्व सभासदांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित केले
.याचे संयोजन डॉ मोहन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली शब्बीर मुजावर यांनी केले.सलग १० वर्षे संस्कार प्रतिष्ठान चतुश्रुंगी नवरात्र उत्सवात बंदोबस्ताला मदत करित आहे.वरिष्ठ पोलीस निरिक्षक राजकुमार वाघचवरे साहेब यांनी प्रतिष्ठानच्या सर्व सभासदांचे कौतुक केले.

error: Content is protected !!