सोमाटणे:
शेलारवाडी ता.मावळ येथील ग्रामस्थांना सतत वीजपुरवठा खंडित होणे,अपुरा वीजपुरवठा होणे,वीजवाहक वायर तुटणे,डीपी मध्ये जाळ होणे या समस्यांना सामोरे जावे लागत होते.वेळोवेळी निवेदने देऊनही वीजेची समस्या सुटली जात नसल्याने अखेर गावातील युवकांनी महाराष्ट्र विद्युत वितरण मंडळाचे कार्यकारी अभियंता पुरोहीत यांची भेट घेऊन येथील वस्तुस्थिती समजावून सांगितली.
परिस्थितीचे गांभीर्य ओळखून स्वतः पुरोहीत यांनी शेलारवाडी गावातील सर्व वीजसमस्येचे प्रत्यक्ष अवलोकन करुन तात्काळ कर्मचारी वर्ग बोलावून घेतला.इंदोरी ते कुंडमळा या भागातील हायटेंशनवर आलेल्या झाडाच्या फांद्या तोडणे,वाकलेले खांब सरळ करणे,शेलारमळ्यातील ओव्हरहेड वायरवरील झाडे कापणे,माळीवाड्यातील डीपीमधील जळलेली केबल व जळलेल्या पट्ट्या दुरुस्त करणे,खाली लटकत असलेल्या वायरी ओढून घेऊन सरळ करणे इ.कामे करण्यात आली.
ग्रामस्थांच्या विविध मागण्यांचा विचार करुन मा.पुरोहीत साहेब यांनी हाय टेंशन लाईन इंदोरी ऐवजी इतर ठिकाणांहून आणणे,भेगडेवाड्यातील डीपी बॉक्स बदलणे,सर्व ओव्हरहेड वायर व्यवस्थित करुन देणे,योग्य तिथे थ्री फेज वायर टाकणे व इतर बारीकसारीक कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी ग्रामस्थांच्या वतीने माजी उपाध्यक्ष अशोक शेलार,भाजप शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,युवा नेते अमित भेगडे,सामाजिक कार्यकर्ते संजय माळी,माऊली भेगडे,शाम मोहिते,संदेश भेगडे,सूरज शेलार,राजू काशामोल्ला,कानिफनाथ भोसले,दत्तात्रय शेलार इ.ग्रामस्थ उपस्थित होते..पुरोहीत साहेबांनी दाखवलेली कामाची तत्परता पाहून शेलारवाडी येथील ग्रामस्थांनी त्यांच्या कामाचे कौतूक केले.

error: Content is protected !!