टाकवे बुद्रुक:
मावळचे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त शिवाजी असवले मित्र परिवार व हिलिंग हॅन्डस फाऊंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमान
मोफत आरोग्य तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिवाय विविध उपक्रमांनी आमदार शेळके यांचा वाढदिवस साजरा करण्यात येणार असल्याची माहिती राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले यांनी दिली.
या आरोग्य तपासणी शिबीरात पोटाचे सर्व विकार मुळव्याध (पाईल्स), भगिंदर (फिस्चुला), बध्दकोष्ष्टता
(शौचास साफ न होणे), फिशर, हर्निया, व्हेरिकोस व्हेन्स तसचे समतोल आहार आणि अजुन पोटाशी निगडीत इतर सर्व आजार व विकारांवर मार्गदर्शन करण्यात येईल.
तसेच आंदर मावळातील शालेय विद्यार्थ्यांना खाऊ वाटप, गरजूंना धान्य वाटप, आदिवासी पाड्यावर ब्लॅंकेट वाटप करण्यात येणार आहेत.
भैरवनाथ मंदिर, टाकवे बु येथे मंगळवार दि.१९/१० /२०२१ रोजी सकाळी ११ वाजता आमदार शेळके यांचा अभिष्टचिंतन सोहळा होणार आहे.शिवाजी असवले म्हणाले,” या सगळ्या उपक्रमास नागरिकांनी सहभागी व्हावे.आमदार सुनिल शेळके यांच्या कामाची उंची अधिक उंच उंच व्हावी, तसेच त्याच्या सामाजिक कार्यात आपलाही सहभाग असावा यासाठी या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

error: Content is protected !!