वडगाव मावळ:
येत्या काही दिवसांत तळेगाव एमआयडीसी.टप्पा क.४ मधील निगडे,आंबळे,कल्हाट,पवळेवाडी,येथिल स्थानिक शेतकऱ्यांच्या मागण्या माण्य करून ३२/१ तात्काळ लागू करण्यात यावा, अन्यथा पुढील काही दिवसात शेतकरी बचाव कृती समितीच्या वतीने
निगडे,आंबळे,कल्हाट,पवळेवाडीतील सर्व शेतकरी
निगडे ते मुंबई असा पायी अर्धनग्न मोर्चाने आंदोलन करतील , शेतकऱ्यांचा अंत पाहू नका असा निर्वाणीचा इशारा या समितीने दिला आहे.
येत्या १५ दिवसात वरिल गावचे ३२/१
करण्याचे लेखी पत्र कृती समितिला द्यावे आणि कृती समितीच्या इतर मागण्या मान्य कराव्यात. अन्यथा आंदोलन करण्याची वेळ आल्यास त्याचे होणाऱ्या
परिणामांची जबाबदारी ही शासनाची राहील अशा इशाराही या समितीने शासनाला दिला आहे. याच विषयी
शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी मुख्यमंत्री,उद्योगमंत्री,एम.आय.डी.सी. चे सर्व अधिकारी यांचे समवेत शेतकरी बचाव कृती समिति बरोबर मिटिंग लावावी ही अशी अपेक्षा या शेतकरी समितीने केली आहे.
उद्योगमंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई,मुख्य अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ मुंबई,जिल्हाधिकारी पुणे,प्रादेशिकअधिकारी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ पुणे,उपविभागीय अधिकारी मावळ -मुळशी पुणे,तहसिलदार सो वडगाव मावळ यांनाही या अनुषंगाने निवेदन दिली आहे.
माजीमंत्री बाळा भेगडे यांच्या नेतृत्वाखाली समितीचे अध्यक्ष शांताराम कदम यांच्या शिष्टमंडळाने औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची भेट घेऊन या बाबतीत चर्चा केली आहे.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,” तळेगाव एम.आय.डी.सी.टप्पा क्रमांक ४ साठी निगडे,आंबळे,कल्हाट,पवळेवाडी,येथिल स्थानिक शेतकऱ्यांच्या एम.आय.डी.सीने १२मे२०१७रोजी आदेश
जारी केल्याने स्थानिक शेतकऱ्याचा एम.आय.डी.सी.ला विरोध होता.
परंतु प्रशासना बरोबर अनेक मिटिंगा व बैठका झाल्यानंतर त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांच्या जमिनी वगळण्यात येतील असे आश्वासन दिले होते तसेच गावाच्या विकासाबाबत एम.आय.डी.सी. चे निगडे एम.आय.डी.सी. नामकरण करणे तसेच रोजगार,शिक्षणाच्या सोयी स्थानिकांना विकासाची कामे देणे,पर्यावरणाचा -हास होणार नाही असे प्रकल्प आणून व इतर मागण्याबाबत प्रशासनाने त्यावेळी सकारात्मक
भुमिका घेतली.
शेतकऱ्यांच्या जमिनी वाचतील असे एम.आय.डी.सी.ने भुमिका घेतल्याने दि.२७/१२/२०१८ रोजी शासनाने
जमिनीचा मोबदला म्हणुन प्रति एकरी ७३०००००रु बाजार निश्चित केला व नंतर संपुर्ण प्रक्रिया संथ गतिने कामकाज चालू झाले. वरील जमिनीचे दर निश्चित झाल्याने या भागामध्ये गुंतवणूक दार,एजंटने प्रत्येक कुटुंबातील नाती गोती यात फूट पाडून गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी मध्ये कायदयाचा व दहशतीचा
उपयोग करुन लेटिकेशन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु केला.
त्यामुळे चारही गावातील शेतकरी हवाल दिल झाला आहे. प्रत्येक कुटुंबात कलह निर्माण झाल्याने भविष्यात या गावात काहिही विपरित घडू शकते. वरिल नमुद बाबिंची दखल घेउन आपण चारही गावचे ३२/१ त्वरित
करावे या मागणि करिता २८/१२/२०२० रोजि वाकडेवाडी येथिल एम.आय.डी.सी. च्या
कार्यालयात दुरचित्र प्रणालिद्वारे बैठक घेण्यात आली. त्यामध्ये मा.राज्यमंत्री बाळाभाऊ
भेगडे व कृती समिती चे सर्व पदाधिकारी व शेतकरी आणी एम.आय.डी.सी.चे वतिने अतिरीक्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचेत संयुक्त बैठक झाली.यांनी दहा दिवसाची मुदत मागुण १५ जानेवारी
२०२१ पर्यंत ३२/१ ची संपुर्ण कार्यवाही केली जाईल परंतू कृती समितिने आंदोलन करु नये अशी विनंती केली म्हणून त्यावेळेचे आंदोलन स्थगित केले नंतर अद्याप पर्यंत कोणतिही प्रत्यक्ष कार्यवाही करण्यात आली नाही.
चारही गावचे संपुर्ण भुमापणाचे सर्वेक्षण पुर्ण झाले नंतर अधिकारी आता सांगतात की ही गावे पर्यावरण क्षेत्र म्हाणुन घोषीत आहे त्यामुळे एम.आय.डी.सी. ने शेतकऱ्यांचीफसवणूक केली आहे असे निदर्शनास येत आहे.
त्यानंतर दि.१४जानेवारी२०२१ रोजी एम.आय.डी.सी. चे प्रादेशिक अधिकारी यांनी पेपर जाहिर केले की पुण्यात सहारा सिटि,लवासा सिटि नंतर अजुन एक
लेक सिटि ह्या गावात उभी राहत आहे.तळेगाव टप्पा क.४मध्ये ६हजार एकर मध्ये ४०/६० प्रमाण धरूण,औद्योगिक व रहिवाशी क्षेत्राचा विकास करणार आहे यात २००० एकर क्षेत्रावर लेक सिटि उभारणार आहे यात सर्व आंतरराष्ट्रिय दर्जाच्या सुविधा
देणार त्यासाठी एम.आय.डी.सी.ने आंतराष्ट्रिय दर्जाच्या निविदा मागविल्या आहेत असे स्पष्ट वृतांत मध्ये बातमीत देउन प्रसिद्ध केले होते.सबंधित अधिकारी यांनी चमकोगिरी केली आहे.
त्यानंतर कृती समितीच्या असे निदर्शनास आले की संबधित अधिकारी हे शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे त्यानंतर महाराष्ट्र शासनाने दि.२२/०४/२०२१ रोजी
च्या राजपत्रात प्रसिध्दिस दिलेल्या पत्रात आंबळे गावचे ३२/१ची कार्यवाही पूर्ण केली.म्हणून वर वर नमुद केलेल्या घटना कर्मानुसार केवळ शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न शासन करत आहे म्हणून कृती समितिच्या वतिने पुन्हा १०ऑगस्ट २०२१ रोजी आंदोलन
करण्याचे ठरविण्यात आले,परंतु सदर खात्याचे कोणतेही अधिकारी चर्चेसाठी तयार झाले नाही.
त्यावेळी सर्व खात्यांना पत्रव्यवहार करण्यात आला होता शेवटी दि.१०/०८/२०२१ रोजी आंबी चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. त्या आंदोलनाला संबधित खात्याचे वरिष्ठ अधिकारी हजर झाले नाही,म्हणुन स्मरण पत्र मा.प्रादेशिक अधिकारी एम.
आय.डी.सी. वाकडेवाडी,पुणे यांना पुन्हा दि.१३/०९/२०२१ रोजी पत्र देऊन आंबळे
गावचे पेमेंट १५ दिवसाच्या आत वाटप चालू करावे व वगळलेले गट ग्रामपंचायत स्तरावर जाहीर करावे अशा आशयाचे पत्र दिले आहे.

error: Content is protected !!