वडगाव मावळ:
मावळचे आमदार सुनील शेळके यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे नियोजन केले जात आहे. आमदार शेळके यांचा यंदाचा वाढदिवस अभूतपूर्व साजरा करण्यासाठी समर्थकांनी कंबर कसली आहे.यासाठी समर्थक मैदानात उतरले आहे. वाढदिवसाच्या आठ दिवस अगोदर उपक्रम व कार्यक्रम राबवण्यावर भर आहे.
२० ऑक्टोबर आमदार शेळके यांचा वाढदिवस.शेळके यांच्या या वाढदिवसाला अजून आठवडा शिल्लक असतानाच आमदार शेळके समर्थकांनी तालुक्यात फ्लेक्स लावून आमदार साहेबांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे संकेत दिले आहे. राष्ट्रवादीचीची स्थापना झाल्यानंतर सुनील शेळके यांच्या रूपाने मावळ तालुक्यात घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवून विजयश्री मिळवून देण्याचा मान आमदार शेळके यांनी राष्ट्रवादीला दिला.
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर तालुक्यात राष्ट्रवादीचा आमदार निवडून येत नाही याचे शल्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांना होते. ते शल्य गतवर्षीच्या निवडणुकीत मोठे मताधिक्य मिळवून सुनील शेळके आमदार झाले.
त्यांनी मिळवलेला विजय, हा ऐतिहासिक विजय ठरला. मागील वाढदिवस कोरोनाच्या पार्श्वभूमीवर साधेपणाने साजरा करण्यात आला.त्यामुळे शेळके समर्थकांना लाडक्या आमदारांचा वाढदिवसाचे सेल वाढदिवसाचे सेलिब्रेशन करताना मर्यादा आल्या .यंदा मात्र कोरोनाची संचारबंदी उठून सर्व व्यवहार नियमितपणे सुरू झाले.सार्वजनिक कार्यक्रमाची बंदी उठली. त्यामुळे आमदार सुनिल शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त तालुकाभर वेगवेगळ्या कार्यक्रमांची पर्वणी कार्यकर्ते आणि नागरिक यांना अनुभवता येणार आहे.यासाठी कार्यकर्ते मैदानात उतरले आहेत.
आमदार सुनिल शेळके यांचे उपक्रम म्हणजे उत्तम दर्जाचे आणि नियोजनाबद्दल आखणीचे कार्यक्रम.याचा अनुभव तालुक्यातील जनतेने घेतला आहे. कोरोनाची संचारबंदी बंदी उठवल्यावर दसऱ्यानंतर दिवाळीपूर्वी आमदार शेळके यांचा वाढदिवस येत असल्याने या वाढदिवसाचे सेलिब्रेशन मोठ्या जोमात होईल असच तरी सध्या चित्र दिसते.पुणे मुंबई द्रुतगती महामार्ग, पुणे मुंबई राष्ट्रीय महामार्ग ,वडगाव ,तळेगाव, लोणावळा ,देहूरोड, कामशेत ,अंदर ,मावळ ,नाणे मावळ ,पवन मावळ या भागात आमदार शेळके यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देणाऱ्या अनेक फ्लेक्स आपणाला पाहायला मिळतील. याशिवाय व्हाट्सअप ,फेसबूक ,ट्विटर, इंस्टाग्राम, यावरही शेळके यांना शुभेच्छा देणाऱ्या व्हिडिओज आणि फोटो याची राळ उठली आहे.
तालुक्यातील सर्वसामान्य कार्यकर्त्यांपासून नेते शेतकऱ्यांपासून उद्योगपती पर्यंत सर्वांनाच वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार शेळके यांच्या सोशल मीडिया टीम कडून दिले जाते. या सर्वाची परतफेड आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन केली जाईल असे असे आता दिसतेय.आमदार शेळके यांच्या सामाजिक आणि राजकीय कारकिर्दीच्या अनेक आठवणी वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आमदार शेळके यांच्या सोबतच्या सेल्फी, ग्रुप फोटो याचीही सोशल मीडियावर धूम उडाली. आपल्या नेत्याच्या वाढदिवसाला इतरांपेक्षा आपला उपक्रम कसा सरस ठरेल याही हेतूने शेळके समर्थकांनी वेगवेगळ्या उपक्रमांना गाव पातळीवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातील लोकप्रिय कीर्तनकार निवृत्ती महाराज देशमुख यांच्या किर्तनाचा कार्यक्रम,कोणी आरोग्य तपासणी शिबिर ,कोणी गावोगावी वस्तूंचे वाटप करते, कोरोना योद्धा पुरस्कार असे उपक्रम घेतले जात आहेत. मावळ तालुक्यातील वडगाव फाटा या मुख्य चौकात आमदार शेळके यांच्या छबी असलेल्या फ्लेक्स नागरिकांचे लक्ष वेधत आहे. द्रुतगती मार्गावरील सोमाटणे येथील टोल नाक्यावर असाच फ्लेक्स दिसून येतोय. दरम्यान, मागील वर्षी कोरोनाच्या संकटात अनेक जीवाभावाची माणसं सोडून गेली. आप्तस्वकीय यांनीही जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन आमदार सुनिल शेळके यांनी केले होते,त्या आवाहन साद घालीत मागील वर्षाचा वाढदिवस साजरा करण्यात आला नव्हता.कोरोनाच्या संकटात ‘मावळचे कुटूबप्रुमख’ ही जबाबदारी घेऊन आमदार शेळके काम करीत त्याच्या याही कामाला हातभार लावीत शेळके समर्थकांनी आरोग्य विषयी उपक्रम राबविले होते.

error: Content is protected !!