टाकवे बुद्रुक:
अंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अनुसूचित जाती जमातीच्या सेलच्या अध्यक्षपदी टाकवे बुद्रुक येथील शांताराम वामन साबळे यांची निवड करण्यात आली. मावळचे आमदार सुनील शेळके ,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी अंदर मावळ राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष मारुती असवले, सरपंच भूषण असवले, उपसरपंच ऋषीनाथ शिंदे,सचिन धनवे आदी उपस्थित होते . साबळे यांनी सेवानिवृत्तीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सक्रिय होणे पसंत केले.
साबळे म्हणाले,” लोकनेते शरद शरद पवार साहेब उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे विचार पोहोचवण्यासाठी आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत राहील .पक्षसंघटना विस्तारासाठी सामाजिक उपक्रम राबवण्यावर भर ठेवणार आहे.

error: Content is protected !!