कामशेत :
कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट व महावीर हॉस्पिटल यांच्या वतीने नवरात्र उत्सव आजचे औचित्य साधून आळंदी येथील अन्नपूर्णा माता संस्थान ला अन्नधान्य चे वाटप करण्यात आले .महावीर हॉस्पिटल चे सर्वेसर्वा डॉ. विकेश मुथा यांच्या वतीने हे धान्य कीट देण्यात आले. अन्नपूर्णा माता संस्थानचे ह.भ.प.रामेश्वर महाराज मानमोडे यांच्याकडे ही मदत सुपूर्त करण्यात आली.
कामशेत शहर शिवसेनेचे शहरप्रमुख गणेश भोकरे , डाॅ. देविलाल भांबू, डाॅ. सावंत उपस्थित होते.
जनसेवा हीच ईश्वर सेवा मानून काम करणाऱ्या कांबेश्वर महादेव सेवा ट्रस्ट चा अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम वर्षभर विविध ठिकाणी असतो .कोरोना महामारी संकटात अनेक गरजूंना कांबेश्वर सेवा ट्रस्ट ने मदतीचा हात पुढे केला आहे.
नुकत्याच झालेल्या चक्रीवादळात नुकसान झालेल्या अनेक कुटुंबांना देखील या ट्रस्टने मदत केली आहे. पूरग्रस्त परिस्थिती असो अथवा नैसर्गिक आपत्ती कांबेश्वर महादेव ट्रस्ट व डॉ. विकेश मुथा यांची टीम मदतीसाठी सदैव तत्पर असते .मावळ तालुक्यात ज्ञानेश्वरी निरूपण सोहळा समिती स्थापन तालुक्यात ज्ञानेश्वरी निरुपणाचे विविध सोहळे झाले .यात डॉ
विकेश मुथा यांचा मोठा सहभाग होता.
वारकरी सेवा ही मुथा यांची आरोग्यातील सर्वात आनंदी सेवा .पंढरपूर ,आळंदी, देहू या तीर्थस्थळांना पायी जाणाऱ्या वारकऱ्यांची सेवा त्यांच्या हातून नेहमी होत असते .याच अनुषंगाने आळंदीतील अन्नपूर्णा माता संस्थांना हा मदतीचा हात पुढे केला आहे .
डॉ.विकेश मुथा म्हणाले,” सर्वसामान्य माणसांना केलेली मदत ही भगवंतापर्यंत पोहोचते .म्हणून परमेश्वरानं गोरगरिबांची साधुसंतांची आणि रांजल्या गांजल्या ची सेवा करण्यासाठी बळ द्यावे. देवाच्या कृपेने ही सेवा करायची सद्बुद्धी मिळत आहे. सेवेचे हे अखंड वृत्त असंच चालू राहण्यासाठी परमेश्वर पाठीशी ठाम उभा रहावा. एवढेच देवाकडे मागणी आहे.
सध्या नवरात्र उत्सव सुरू आहे आदिमाता सेवा करण्याची ही संध्या कडून या सेवेत रुजू होण्यासाठी जे करता येईल ते करताना समाधानच आहे .म्हणूनच या आठवड्यात नवरात्र उत्सवानिमित्त तळेगाव दाभाडे येथील स्वप्ननगरी सार्वजनिक मित्र मंडळ यांनी आयोजित केलेल्या मोफत आरोग्य तपासणी शिबिरात काम करण्याची संधी मिळाली .येथील वयस्कर व ज्येष्ठ नागरिकांना आरोग्याच्या बाबत मार्गदर्शन करताना त्यांच्या चेहऱ्यावरील आपुलकीचा भाव मनाला भावून गेला .अशा आपुलकी तून काम करण्याची उर्मी वाढते.

error: Content is protected !!