पिंपरी:
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ३९ व्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाच्या संकटकालीन कालावधीत संस्कार प्रतिष्ठानच्या उल्लेखनीय कार्याबद्दल सन्मान करण्यात आला.
कोरोना जनजागृती अभियाना, कष्ट कष्टकरी कामगार,मजूर,धुणे-भांडी काम करणाऱ्या महिला,परप्रांतीय कामगार,न्हावी,शिंपी,मंदीर परिसारातील गुरव समाज,घंटागाडी कामगार,साफसफाई कामगार,अनाथ आश्रम,वृध्दाश्रम,मतीमंद मुलांचे आश्रम,जेष्ठ नागरिकांना औषध वाटप, मास्क वाटप,सॕनिटायझर वाटप,धान्याचे किट वाटप असे विविध प्रकारची मदत संस्कार प्रतिष्ठानने केल्याबद्दल पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने कोरोना योध्दा म्हणून हा गौरव करण्यात आला.
पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त राजेश पाटील,महापौर माई ढोरे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.कोरोनाचे नियम पाळून प्रतिष्ठानच्या वतीने संस्थेचे अध्यक्ष डॉ मोहन गायकवाड,कार्याध्यक्ष राजेंद्र फडतरे,विनोद सुर्वे,अभिनेत्री रुपाली पाथरे,अनुषा पै,नलिनी काकडे,पल्लवी नायक यानी सन्मान स्विकारला या सन्मानाबद्दल संस्थेच्या वतीने डॉ मोहन गायकवाड यांनी पालिकेचे आभार मानले.

error: Content is protected !!