
लोणावळा:
लोणावळा-खंडाळा परिसरातील टपरीधारक, टॅक्सी,रिक्षा चालक, मालक,माळी कामगारांच्या संघटनेने स्थानिक प्रशासन व काही पोलीस अधिकाऱ्यांच्या दडपशाहीच्या निषेधार्थ लोणावळा येथे ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.
अंदोलन आपल्या न्याय व हक्कासाठी एकजूटीने आंदोलनात सहभागी झाल्याने यावर लवकरच योग्य निर्णय होईल असा विश्वास मावळचे आमदार सुनिल शेळके यांनी व्यक्त केला.
लोणावळ परिसरातील व्यवसायधारक पर्यटनांवर अवलंबून आहे. सद्यस्थितीत कोरोनाचे सावट कमी होत असताना पर्यटनस्थळे सुरू होत आहे. ओला-उबेरच्या गाड्यांना स्थानिक टॅक्सी, रिक्षाचालक अनेक वर्षांपासून विरोध करीत आहेत. तसेच छोटे-मोठे व्यवसाय टपरीधारक, हातगाडीधारक, पर्यटन स्थळे व परिसरात व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत आहेत.
परंतु स्थानिक प्रशासन, अधिकारी चुकीच्या पद्धतीने टपरीधारकांवर अतिक्रमणाच्या नावाखाली कारवाई करून गोरगरीब जनतेची उपासमार करीत आहेत. या टपरीधारकांना नगरपरिषदेने योग्य ठिकाणी जागा उपलब्ध करावी.हॉकर्स झोन करावेत. अशी मागणी स्थानिकांची आहे.
आधीच कोरोनामुळे आर्थिक संकटात असणाऱ्या नागरिकांचा गांभीर्याने विचार व्हावा.माळीकाम करणाऱ्या कामगारांना देखील न्याय मिळाला पाहिजे. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळवून देण्यासाठी सर्वांनी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. कायदा सर्वांसाठी समान आहे. सर्वांनी कायद्याच्या अधीन राहून काम करावे.परंतु काही ठराविक मंडळींनी राजकीय द्वेष न ठेवता सर्वांना समान वागणूक द्यावी. गरीब जनतेवर अन्याय होता कामा नये,असे आवाहन आमदार शेळके यांनी केले.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




