
वडगाव मावळ:
११ ऑक्टोबरला महाविकास आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली,शेतक-यांवर झालेल्या अमानुष हत्या प्रकरणी बंदचा नारा,हे आंदोलन स्तुत्य असले तरी यापूर्वीच्या अंदोलनात निष्पाप शेतकऱ्यांचे बळी गेले,त्यावेळी अशी महाराष्ट्र बंदची हाक देऊन राज्यकर्त्यांनी शेतक-याप्रति आपले संवेदनशीलता का दाखवली नाही,अशी खंत पुणे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भाई भरत मोरे यांनी व्यक्त केली.
सगळेच राजकीय पक्ष शेतक-यांच्या प्रति कळवळा असल्याचे भासवून शेतक-यांची दिशाभूल करीत असल्याचा आक्षेप भाई मोरे यांनी घेतला. पवना बंदिस्त जलवाहिनीचेअंदोलन असो की एमआयडीसीला विरोध करणारे अंदोलन असो, की परतावा मिळविण्यासाठी केलेले अंदोलन याचे सोयीस्कर दुर्लक्ष केल्यावर त्यांनी बोट ठेवले. या ठिकाणी शेतक-यांचे बळी गेलेष, गोवारी हत्याकांड, अन्य ठिकणीही शेतकऱ्यावर गोळीबार झाला. या पापांचे धनी कोण ? असा प्रश्न त्यांनी केला.
सत्तेवर येताना शेतकऱ्यानं बद्दल जाहीरनामा तयार होतो .१००% कर्जमुक्ती, १००% ७/१२ कोरा , १००% सिंचन, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव , प्रकल्प ग्रस्तांचे पुनर्वसन, बेरोजगारी या योजनांचे काय झाले? असे सांगून भाई मोरे म्हणाले,”
सर्वच पक्षांच्या जाहीरनाम्यात उल्लेख असतो. परंतु शेतकऱ्यांची हत्या झाली की निषेध करतो. सत्तेवर येतो. परंतु ज्यांच्या काळात शेतकरी हत्या झाली की, विरोधी निषेध करतो. म्हणजे प्रत्येक हत्येचे रुपांतर मता मध्ये होते. कोणत्याही पक्षात शेतकऱ्या बद्दल प्रामाणिकता नाही याचे वाईट वाटते.
एकूण मतीत अर्थ काय सत्ता आली की सर्व पक्ष आपापला सोयीस्कर जाहीरनामा विसरतात. न्यायासाठी आंदोलन केले की गोळ्या घालतात अथवा एखादा अपघात घडून आणतात.यालाच प्रामाणिक व सोयीस्कर राजकारण म्हणतात, याला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचे भाई मोरे म्हणाले.
- एका तासात थाळी खाऊन दाखवा, आणि मिळवा बुलेट मिळवा:हाॅटेल शिवराजची खास ऑफर
- राऊतवाडीत गरजू विद्यार्थ्यांना शालेय वस्तु , दप्तर ,वह्याचे वाटप हिंदवी स्वराज्य प्रतिष्ठानचा उपक्रम
- मनसेची आंदर मावळात बैठक
- कुरणवस्तीची शाळा झाडांची शाळा:सरपंच सविता भांगरे
- गरजु मुलांसाठी एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत भोयरे येथील शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप




